मुंबई : loksabha election 2019 सोशल मीडियाचा वापर चाहते आणि कलाकारांमध्ये असणारी दरी कमी करण्यासाठी केला गेला. मुख्य म्हणते या माध्यमातून कलाकार मंडळींनी फक्त त्यांच्या आयुष्यात चाहत्यांना प्रवेश करण्याची मुभाच दिली नाही तर याच चाहत्यांना काही महत्त्वपूर्ण गोष्टींची जाणही करुन दिली. 'लागिरं झालं जी' या मालिकेतील भूमिकेमुळे प्रकाशझोतात आलेल्या अभिनेता निखिल चव्हाण याने नुकताच पोस्ट केलेला एक व्हिडिओ हेच सिद्ध करत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'विकी'च्या भूमिकेमुळे प्रकाशझोतात आलेल्या निखिलने आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वांनाच मत करण्याची विनंती केली आहे. टीव्हीचा रिमोट  हातात असला की हवी ती मालिका, खेळाचे सामने पाहता येतात, गाणी ऐकता येतात, सिनेमे पाहता येतात, असं अगदी सोपं आणि रोजच्या आयुष्यातील उदाहरण त्याने देऊ केलं आहे. एक कलाकार म्हणून आपण कोणत्याही प्रोजेक्टची स्क्रीप्ट निवडताना प्रचंड विचार करतो, असंही निखिल म्हणताना दिसत आहे. थोडक्यात काय तर अनेक गोष्टींची निवड ही अतिशय विचारपूर्वकपणेच केली जाते.