लक्मे फॅशन वीक २०१८ : अभिनेत्री कृती सेननचा जलवा
लक्मे फॅशन वीकमध्ये डिझायनर तरुण तहलानीसाठी अभिनेत्री कृती सेननने रॅंप वॉक केला.
मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही लक्मे फॅशन वीक पार पडला. त्यात अनेक डिझाईनर्सने विविध मॉडल्सच्या माध्यमातून आपल्या डिझाईन्स सादर केल्या.
शो टॉपर ठरली ही अभिनेत्री
लक्मे फॅशन वीकमध्ये डिझायनर तरुण तहलानीसाठी अभिनेत्री कृती सेननने रॅंप वॉक केला. येथे कृती शो टॉपर ठरली. चमकदार लेहंग्यात कृती अत्यंत आकर्षक दिसत होती. तरुण तहलानी यांच्या डिझायन्समध्ये ग्रह, चंद्र, ताऱ्यांच्या डिझाईन्स अधिक असतात. तसंच ड्रेसमध्ये गोल्ड, ब्लू आणि सफेद रंगाचा प्रयोग अधिक प्रमाणात केला जातो. कृतीची बहीण नुपूर सेनन लवकरच बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार आहे. नुपूर सेनन लवकरच हॉलिवूड चित्रपट 'फॉल्ट इन माई स्टार्स' च्या हिंदी रिमेकमध्ये सुशांत सिंग सोबत झळकेल.
या अभिनेत्रींचा जलवा
अभिनेत्री यामी गौतम, डिझायनर मनीष मल्होत्रासाठी तिसऱ्या दिवशी रॅंपवर उतरली. कल्की कोचलिनने देखील रॅपवॉक केला. अभिनेत्री नमिरत कौर, डिझायनर पूजा श्रॉफसाठी रॅंपवर अवतरली. बिग बॉस ११ ची रनर-अप हिना खानने देखील लक्मे फॅशन वीकमध्ये आपला जलवा दाखवला. डिजाइनर महिमा महाजनसाठी अभिनेत्री सुरवीन चावलाने रॅपवॉक केला.
यांचाही रॅपवॉक
लवकरच वेलकम टू न्यूयॉर्क चित्रपटातून झळकणारा करण जोहर आणि सोनाक्षी सिन्हा येथे झळकले. करणने तब्बल ५ वर्षानंतर रॅपवॉक केला. या दोघांच्या डिझाइनर फाल्गुनी आणि शेन पीकॉक यांनीनी रॅपवॉकमध्ये त्यांची साथ दिली.
मॉडेल वालुस्चा डिसूजा यांनीही रॅपवॉकवर झळकल्या.