Antara Marwah Baby Bump: सध्या लॅक्मे फॅशन वीक समर/रिसोर्ट 2023 (Lakme Fashion Week Summer/Resort 2023) या दिमाखात साजऱ्या होणाऱ्या फॅशन वीकची सर्वत्र चर्चा आहे. येथे बॉलिवूड सेलिब्रेटी हे रॅम्पवॉक करताना दिसतात. लॅक्मे फॅशन वीकचं हे यंदाचे 24 वे वर्षे आहे. 1999 पासून मुंबईत लॅक्मे फॅशन वीकच्या (LFW) निमित्तानं ग्लॅमर विश्वाची मुहुर्तमेढ रोवली गेली होती. त्यामुळे गेली दोन दशक ही फॅशन परंपरा जोरात सुरू आहे. या नामवंत फॅशन शोमध्ये अनेक मोठंमोठे सेलिब्रेटी हे गर्दी करत असतात. कधी अतिथी म्हणून हजेरी लावतात तर कधी शॉजस्टॉपर म्हणून रॅम्प वॉक (LFW Ramp Walk) करत शोची रंगत वाढवतात. या फॅशन शोचा इतिहास जितका मोठा आहे तितकंच या फॅशन शोमध्ये अनेकांचे रॅम्प वॉकही गाजले आहेत, कधी वाईट कारणांमुळे तर कधी चांगल्या. या रॅम्पवरून कोणी कधी धडपडलं (LFW Controversies) आहे तर कोणी कधी भांडलंदेखील आहे. (Lakme Fashion Week 2023 Actress Anatara marwah tina ambani niece baby bump ramp walk goes viral on internet)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या फॅशन शोमधली सध्या लक्षवेधी गोष्ट ठरलीये ती म्हणजे प्रेग्नंट अभिनेत्रींचा रॅम्प वॉक (Anatara Marwah Ramp Walk). 2016 साली अभिनेत्री करीना कपूरनं (Kareena Kapoor Pregnancy Ramp Walk) गरोदर असताना रॅम्प वॉक केला होता. नामवंत डिझानरच्या कलेक्शनसाठी तिनं रॅम्प वॉक केला होता. करीना कपूर ही लॅक्मे फॅशन वीकची गेल्या वीस वर्षांची ब्रॅण्ड एबेसिडर आहे. त्यामुळे या सोहळ्याच्या ग्रॅन फिनालेला ती नेहमीच उपस्थित दर्शवते. त्यानंतर अभिनेत्री नेहा धुपिया हिनं (Neha Dhupiya Pregnancy Ramp Walk) आपल्या पहिल्या गरोदरपणाच्या वेळीही लॅक्मे फॅशन वीकला हजेरी लावली होती. त्यामुळे अशा अभिनेत्रींची तेव्हा जोरदार चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर गरोदरपणात रॅम्पवॉक करणं हा सध्या एक ट्रेण्डच ठरला. 


बेबी बंप फ्लॉन्ट करायचा ट्रेण्ड आपली संस्कृती आहे का?


खरंतर हा ट्रेण्ड इथल्या मॉडेल्सनं पहिल्यांदा आणला होता. पद्मलक्ष्मी (Padmalaxmi) या जगप्रसिद्ध मॉडेलनं गरोदर असताना रॅम्प वॉक केला होता. त्यानंतर ती मॉडेलिंगच्या विश्वापासून दूर राहिली. परंतु तेव्हा तिच्या या रॅम्पवॉकची प्रचंड चर्चा झाली होती. त्यानंतर अनेक मॉडेल्सनी असा प्रयत्नही केला होता. मध्यंतरी हा ट्रेण्ड थांबला होता परंतु आता पुन्हा एकदा या ट्रेण्डनं जोर धरला आहे. वाढलेल्या पोटावरती भरलेले कपडे घालून अंग झाकण्याची सुसंस्कृत परंपरा आपल्याकडे होती आणि आहे. परंतु आता ओपनली गरोदरपणी वाढलेलं पोट 'फ्लॉन्ट' (Baby Bump Flaunt Trend) करण्याचा ट्रेण्ड भलताच वाढू लागला आहे. वाढलेलं पोट दाखवणे हे अंगप्रदर्शन नाही का? ही आपली कसली संस्कृती आहे? स्त्रियांना कुठली लाज आहे की नाही? अशाप्रकारे ट्रोलर्सकडून अशा अभिनेत्रींना टीकाही सहन करावी लागते. 


'या' नव्या बदलाचे स्वागतही 


पूर्वी कलाक्षेत्रात अभिनेत्री प्रेग्नंट आहे म्हणून चित्रपट मालिका न मिळणं. रॅम्प वॉक करायला न मिळणं. अशा समस्या होत्या. त्यानंतर अशा बेबी बंप फ्लॉन्ट करण्याचा ट्रेण्ड आला आणि अभिनेत्रींनी आत्मविश्वासानं रॅम्प वॉक करण्याचाही ट्रेण्ड सुरू केला त्यामुळे त्यांच्या धाडसाचे कौतुक करत अनेकांनी या बदलाचे स्वागत केले आणि हा सकारात्मक बदल असल्याचेही बोलले गेले. 


कोण आहे अंतरा मारवाह? (who is Anatara Marwah)


परंतु आता अशाच एका लोकप्रिय सेलिब्रेटीनं लॅक्मे फॅशन वीकमध्ये आपले बेबी बंप फ्लॉन्ट केले आहे, सध्या सोशल मीडियावर तिचीच चर्चा आहे. कपूर घराण्याशी संलग्न असलेला अभिनेता मोहित मारवाह याची पत्नी अंतरा मारवाह हिनं फॅशन शोमध्ये बेबी बंप फ्लॉ़न्ट करत रॅम्प वॉक (Anatara Marwah at Lakme Fashion Week) केला आहे. यावेळी ती शिमरचा गाऊन घातला होता. आपलं वाढलेलं पोट उघडपणे दाखवत तिनं बिनधास्तपणे रॅम्प वॉक केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिचा हा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. त्यावर नानाविध प्रतिक्रियाही उमटताना दिसत असून तिला काही लोकांनी खडेबोलही सुनावले आहेत. यावेळी तिनं शिमर फिटेड स्कर्ट आणि फुल स्लिव्हज प्लंजिंग नेक लाईन ब्लाऊज (Shimmer Outfits) घातला होता. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


अंतरा मारवाह ही अर्जून कपूरची (Arjun Kapoor) वहिनी असून उद्योगपती अनिल अंबानींची पत्नी टीना अंबानी (Tina Ambani) ही भाची आहे. 2014 साली तिनं 'फगली' (Fugly) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.