मुंबई : साऊथ सिनेमांमधील अभिनेत्री लक्ष्मी राय ही सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. कारण लक्ष्मी रायच्या आगामी ‘जूली २’ सिनेमाचा बोल्ड टीझर रिलीज झालाय. लक्ष्मी राय याआधीही अनेकदा चर्चेत आली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र त्यावेळी कारण वेगळं होतं. आधी ती टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी सोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आली होती. आजही तिला त्याबाबत प्रश्न विचारले जातात.


‘जूली २’ सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांच्या अफेअरच्या चर्चांनी जोर धरला आहे. आयपीएल सामन्यांदरम्यान त्यांची ओळख झाली होती. सुरेश रैनासोबत धोनी तिच्या वाढदिवसाला हजर झाला होता. त्यानंतर त्यांचे डेटींग सुरू झाले. २००९ पर्यंत हे प्रकरण बरेच गाजले. मात्र दोघांच्यात मतभेद झाले आणि ते वेगळे झाले. त्यानंतर २०१० मध्ये धोनीने साक्षीशी लिवाह केला. त्यानंतर लक्ष्मीच्या दृष्टीने हे नाते पूर्ण संपले.


असे असले तरी आणि दोघांमध्ये मतभेद झालेले असले, तरी धोनी विषयीचे प्रेम कमी झाले नसल्याचे तिला वाटते. मात्र त्यांच्या या अफेअरबद्दल तिला सतत विचारले जाते, त्यामुळे ती वैतागलेली असते. जुन्या गोष्टी पुन्हा विचारल्या जातात याबद्दल तिला राग येतो. आपल्यावर लागलेला हा एक कलंक असल्याचे ती म्हणते.