मुंबई : गिरणगाव म्हटलं की, डोळ्यासमोर येतो तो लालबाग-परळ परिसर. या परिसराला सांस्कृतिक वैभव लाभलेलं आहे. या परिसरातून अनेक कलाकार समोर आले. हेच कलेच वैभव टिकवून ठेवण्यासाठी 'लालबाग कला महोत्सवा'चे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे यंदाचे 5 वे वर्ष आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२५ व २६ जानेवारी रोजी सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत लालबागमधील पेरूचाळ कपाऊंडमध्ये हा महोत्सव पार पडणार आहे.  मुंबईकरांना या महोत्सवात चित्र, शिल्प आणि नृत्य कलेचा आनंद लुटता येणार आहे. दोन दिवसीय या महोत्सवात विविध कला सादर करण्यात येणार आहेत.  २५ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.


अशी असेल महोत्सवाची रुपरेषा 
25 जानेवारी 2020 
सकाळी 10.30 वाजता - शिल्पगणेशा - शिल्पकार - विशाल शिंदे
सकाळी 10.30 वाजता - अक्षय मांडवकर - नृत्यरूपी अभंग यात्रा
दुपारी 3 वाजता - व्यक्तिचित्रण - चित्रकार - अभिजीत पाटोळे, चित्रकार - निलिशा फड
सायंकाळी 6 वाजता - व्यंगचित्र - व्यंगचित्रकार उदय मोहिते 


26 जानेवारी 2020 
सकाळी 10 वाजता - निसर्गचित्र - चित्रकार नानासाहेब येवले 
दुपारी 2 वाजता - चित्रकला स्पर्धा - 
सायंकाळी 4 वाजता - फ्युजन - नृत्य, चित्र, शिल्प 
नृत्य - अपेक्षा घाटकर 
चित्रकार - विचारक मनोज पालुरकर, शिल्पकार राम कुंभार
सायंकाळी 6 वाजता - मार्गदर्शन, चर्चासत्र, बक्षिस व गुणगौरव सोहळा