ललित मोदींसोबतच्या नात्यावर सुष्मिता सेनची नवीन पोस्ट,म्हणाली...
सुष्मिता सेनची नवीन पोस्ट आली समोर, ललित मोदींसोबतच्या नात्यावर म्हणते, शांतता...
मुंबई : माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन आणि आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांच्या लग्नाची चर्चा काही दिवसांपूर्वीच रंगली होती. या चर्चेवर गुरूवारीच ललित मोदी यांनी डेट करत असल्याचे सांगितले होते.त्यानंतर काल सुष्मिता सेनने, ना लग्न झाले नाहीए आणि ना एंगेजमेंट झालीय, अशी पोस्ट करत डेटच्या वृत्ताला दुजोरा दिला होता.आता आज पुन्हा एकदा तिने नवीन पोस्ट केली आहे.
ललित मोदींसोबतच्या नात्यावर आता सुष्मिता सेनने दुसरी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने मोजक्याच ओळी लिहत तिच्या नवीन नात्यावर बोलणाऱ्यांचा खरपूस समाचार घेतलाय. या पोस्टमध्ये ती म्हणतेय शांतता आणि तिच्या नात्यावरून जी चर्चा सुरु आहे ती संपवण्याची शक्ती दे असं तिने म्हटेलय.
एकूणच तिच्या या पोस्टचा असा अर्थ आहे की,सुष्मिता सेनच्या ललित मोदींसोबतच्या नात्याची सध्या सर्वंत्र चर्चा आहे. या सततच्या चर्चेने तिची शांतता भंग होतेय. त्यामुळे तिला या चर्चातून शांतता हवी आहे असे तिचे म्हणणे आहे. तसेच तिच्या नात्यावर जोर-शोरमध्ये ज्या चर्चा होत आहेत, या चर्चा कमी करण्याची शक्ती तिने देवाकडे मागितली आहे.
ललित मोदींनी गुरूवारी ट्विटरवरुन सुष्मितासोबतचे काही फोटो शेअर केले होते. या फोटोनंतर त्यांच्या नात्यांच्या चर्चेला उधाण आले होते. मात्र ललित मोदींनी लग्न न केल्याचं स्पष्टीकरण देत ते एकमेकांना डेट करत असल्याची माहिती दिली होती. य़ा माहितीनंतर सोशल मीडियासह संपूर्ण देशभरात त्याच्या नात्याची चर्चा सुरु झाली होती.