मुंबई : आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी सध्या त्यांच्या आणि सुष्मिता सेनच्या डेटिंगच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. 14 जुलै रोजी ललित मोदींनी आपण सुष्मितासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची घोषणा केली. त्याचवेळी दोघांचे फोटो बरंच काही सांगून गेले. पण सुष्मितावर विश्वास ठेवायचा झाला तर ती ना लग्नाच्या किंवा एंगेजमेंटच्या मूडमध्ये दिसतं आहे. पण नात्यातील गुंता बाजूला ठेवून ललित मोदींना एक मुलगीही आहे. जिचं नाव आहे आलिया मोदी. आलियाचे ताजे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलीकडे ललित मोदींची मुलगी आलियाचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये आलिया नववधूच्या रुपात उभी असल्याचं पाहायला मिळत आहे. आलिया मोदीचं नुकतंच लग्न झालं आहे. आलियाचं लग्न लंडनमध्ये झालं. त्याचबरोबर, काही फोटोमध्ये, आलिया पांढऱ्या रंगाच्या लेहेंग्यात दिसत आहे तर कधी ती बहु-रंगीत लेहेंग्यात दिसत आहे. आलियाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच पसंत केले जात आहेत.



हे फोटो पाहिल्यानंतर लोकांच्या कमेंट्स जोरदार येत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं आहे की, तू किती सुंदर दिसत आहेस. तर दुसर्‍या एका यूजरने म्हटलं आहे की, जर तू बॉलिवूडमध्ये असतीस तर आज तू नंबर वन हिरोईन असतीस. आलिया ही ललित मोदी आणि त्यांची पहिली पत्नी मीनल मोदी यांची मुलगी आहे.