मुंबई : सध्या सांगायचं झालं तर काही सिनेमांच्या स्क्रिप्टच्या गरजेनुसार कलाकरांना इंटिमेट सीन द्यावे लागतात. सिनेमात इंटिमेट सीन आहेत म्हणून काही कलाकार तो सिनेमा करण्यास नकार देतात. पण अभिनेत्री लारा दत्ताला ऑनस्क्रिन किसिंग सीन करण्यास कोणत्याही प्रकारची समस्या नाही. सिनेमांमध्ये इंटिमेट सीन टेक्निकली शूट केले जातात असं लाराचं म्हणणं आहे. ज्याप्रकारे ऍक्शन सीन कोरिओग्राफ केले जातात त्याचं प्रकारे इंटिमेट सीन देखील कोरिओग्राफ केले जातात असं लाराने सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लाराचा 'हिक्कप्स एण्ड हुक्कप्स' शो लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. शोच्या दिग्दर्शनाची जबाबदारी कुणाल कोहलीच्या खांद्यावर आहे. कॅम्पेनियनसोबत बोलत असताना लारा म्हणाली, 'अभिनय क्षेत्रात मला सर्व प्रकारच्या सीनमध्ये काम करायचं आहे. पण भारतात मी कोणाची पत्नी आहे. मी एक असा शो करत आहे, ज्यामध्ये काही डिमांड असतील.'



एवढंच नाही तर यासंबंधी लाराने पती महेश भूपतीसोबत देखील चर्चा केली. ती म्हणाली, 'महेशसोबत या शोला समजून घेणं माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. कारण यामध्ये महेश समाधानी आहे की नाही, ही गोष्ट समजून घेण तितकचं महत्त्वाचं आहे. मी कोणते सीन करू शकते. त्याचे आमच्या आयुष्यावर काय परिणाम होवू शकतात..'


इंटिमेट सीनबाबत लारा दत्ता म्हणाली की, मला ऑनस्क्रीन किसिंग सीन करायला काहीच हरकत नाही. तुम्हा सेटवर पोहोचल्यानंतर लगेच किसिंग सीन शूट होत नाहीत. इंटिमेट सीन देखील स्क्रिप्टनुसार शूट होतात....