मुंबई : नववर्षाची सुरूवात बॉलिवूडच्या चित्रपटांच्या रिलीज डेटने होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय लीला भंसाळीचा'पद्मावती' हा चित्रपट अनेक वाद विवादांमधून बाहेर पडून अखेर काही कट्स आणि नावात बदल करून रिलीज केला जाणार आहे. 


रिलीज डेटमध्ये बदल 


२५ जानेवारीला 'पद्मावती' हा चित्रपट ' पद्मावत' या नावाने रिलीज होणार आहे. तर या दिवशी अक्षय कुमारचा 'पॅडमॅन' त्याला टक्कर द्यायला सज्ज झाला आहे. 


'पॅडमॅन','पद्मावत' सोबतच 'अय्यारी' देखील रिलीज होणार होता. मात्र त्याच्या रिलीज डेटमध्येबदल करून तो  ९ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.  


'हिचकी'ला 'बूम बूम इन न्यूयॉर्क' चं आव्हान  


जानेवारीप्रमाणेच फेब्रुवारीमध्येही बॉलिवूडचे दोन महत्त्वाचे चित्रपट एकमेकांसमोर ठाकणार आहेत.


करण जोहर, दिलजीत दोसांज, सोनाक्षी सिन्हा, लारा दत्ता आणि रितेश देशमुख यांचा 'बूम बूम इन न्यूयॉर्क' 23 फेब्रुवारी 2018 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाबरोबर 'हिचकी' रिलीज होणार आहे.  


गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूडपासून दूर असणारी राणी मुखर्जी 'हिचकी' चित्रपटातून कमबॅक करणार आहे. राणीला मुलगी झाल्यानंतर ती सिनेक्षेत्रापासून दूर होती.