आज आमच्या बिट्टूचा वाढदिवस, लता दीदींची खास पोस्ट
लता दीदींचा स्वर म्हणजे स्वर्गीय सुखाचा आनंद.
मुंबई : महाराष्ट्र भूषण, पद्मभूषण, पद्मवीभूषण ते भारतरत्न अशा अनेक पुरस्कारांनी लता दीदींना गौरविण्यात आलं आहे. लता दीदींचा स्वर म्हणजे स्वर्गीय सुखाचा आनंद. लता दीदींच्या चर्चा कायम सर्वत्र वाऱ्यासाख्या पसरत असतात. कही दिवसांपूर्वी त्यांनी इन्स्टाग्रामवर पदार्पण केलं आहे. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून त्या नेहमी त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असतात.
आता देखील त्यांनी त्यांच्या पाळीव कुत्र्याचे गोड फोटे शेअर केले आहेत. त्यामागे कारण देखील फार खास आहे. त्यांच्या बिट्टूला आज पाच वर्ष पूर्ण झाली आहेत. याच दिनाचं औचित्य साधत त्यांनी बिट्टूचे काही फटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. सध्या हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
बिट्टूचे फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये 'नमस्कार आज आमच्या बिट्टूचा पाचवा वाढदिवस आहे. Happy Birthday Bittu..' असं लिहिलं आहे. ट्विटरवर कायम सक्रिय असणाऱ्या लता दीदींनी वाढदिवसानंतर दोन दिवसांनी इन्स्टाग्रामवर पदार्पण केले होते. इन्स्टाग्रामवर त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
काही दिवसांपूर्वी दीदींची तब्येत अत्यंत खालावली होती. तब्बल २८ दिवसांनंतर त्यांना घरी आणलं होतं. त्यांना न्युमोनिया झाला होता. मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात दीदींवर उपचार सुरू होते.
उपचारानंतर घरी परतल्याची माहिती खुद्द दीदींनी ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांना दिली होती. त्याचप्रमाणे उपचार करणाऱ्या डॉक्टरचा देवदूत असा उल्लेख करून त्यांचे आभार मानले.