मुंबई : आपल्या स्वरांनी मंत्रमुग्ध करणारा आवाज आज आपल्यात नाही. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. शिवाजी पार्क इथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आज जरी त्या आपल्यात नसल्या तरी त्यांच्या काही खास आठवणी आणि गाणी कायम आपल्या स्मरणात राहणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लतादीदींना आशा भोसले यांच्या काही खास गोष्टी आवडायचा. एका मुलाखती दरम्यान त्यांनी याबद्दल सांगितलं आहे. आशा भोसले यांची गाणी आणि त्यांच्या जेवणाबद्दल लतादीदींनी एक आठवण सांगितली आहे. 


हैरान हूँ मै....! लाखात एक होत्या लतादीदी, कुंडलीतच लिहिलेलं लखलखणारं नशीब


लतादीदी म्हणाल्या की, 'आशाचं हिंदी कौवालीसारखं गाणं मला फार आवडतं. 'निगाहें मिलाने को जी चाहता है' हे गाणं तर सर्वात जास्त आवडणारं आहे. याशिवाय आशाने म्हटलेली मराठी गाणी खूप चांगली आहेत. पण ती भाषा मराठी असल्याने सर्वांना समजेलच असं नाही.' 


ज्यांच्या आवाजावर सारं जग भाळलं, त्या लतादीदींवर कोणत्या पाश्चिमात्य कलाकारांची भुरळ?


'आशाच्या हातची मला बिर्याणी फार आवडते हे मात्र अगदी खरं आहे. बिना मसाल्याची बर्याणी केशर बिर्याणी आवडते. 15 दिवसातून एकदा ही बिर्याणी यायची. आशा जेवण खूप चांगलं करते', असंही दीदी म्हणाल्या होत्या.