मुंबई : जागतिक पटलावर आपल्या स्वरांनी ठसा उमटवणाऱ्या लता मंगेशकर यांनी 6 फेब्रुवारी 2022 ला जगाचा निरोप घेतला. सर्व स्तरांतून या गानसरस्वतीला साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला. (Lata Mangeshkar)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कलाकारांनी कलेच्या माध्यमातून, सर्वसामान्यांनी आणि कुटुंबीयांनी अश्रूंवाटे, खेळाडूंनी त्यांच्या खेळावाटे आणि संरक्षण दलांनी सलामी देत दीदींना मानवंदना दिली. 


लता मंगेशकर यांच्या आवाजाचीच ही किमया. प्रसंग कोणताही असो, दीदींनी त्याला साजेसं गाणं गायलं नाही, असं नाहीच झालं. 


विरहापासून आनंदापर्यंत प्रत्येक क्षणी दीदींचे स्वर आपला आधार झाले. तुम्हाला माहितीये का, ज्या दीदींची गाणी तुमच्याआमच्यासारख्यांच्या प्लेलिस्टचा भाग होते, अशा दीदींना कोणत्या गायकांची गाणी आवडायची? 


लता मंगेशकर या भारतीय चित्रपट गीतांसोबतच पाश्चिमात्य गाणीही आवडीनं ऐकायच्या नॅट किंग कोल, पॅट बून हे त्यांच्या आवडीचे गायक. 



एका मुलाखतीत दीदींनी या कलाकारांची गाणीही गुणगुणली होती. दीदींनी गायलेली ही इंग्रजी गाणी या मुलाखतीनंतर बरीच चर्चेत आली.


इतक्या मोठ्या गायिकेला कोणती गाणी आवडतात हा मोठा रंजक प्रश्न. पण, आता मात्र दीदींच्या प्लेलिस्टमधील हा पाश्चिमात्य गाण्यांचा नजराणाही सर्वांसमोर आला आहे. तुम्ही ही गाणी ऐकली का?