मुंबई : लतादीदींनी उभ्या आयुष्यात संगीतावर आकंठ प्रेम केलं. त्यांनी 36 भाषांमध्ये जवळपास 50 हजारांपेक्षा अधिक गाणी गायली. आज देखील त्यांची गाणी जगण्यासाठी नवी उमेद देतात.  दीदींच्या गाण्यांनी जगाला जगायला शिकवलं. त्यांना कोणी हसवलं असा प्रश्न अनेकांना पडला असेल. एका मुलाखीत दीदींना तुम्हाला कोणी जास्त हसवलं? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर दीदींनी फार कमालीचं उत्तर दिलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीदी म्हणाल्या, 'सेटवर ज्यांनी मला कायम हसवलं ते होते मेहबूब. त्यांची ऍक्टिंग फार उत्तम होती. ते जेव्हा काम करायचे तेव्हा मी हसायची.' यावेळी दीदींनी किशोर दा यांच्याबद्दल देखील मत व्यक्त केलं. 


'स्टुडिओमध्ये किशोर दा यांनी मला फार हसवलं. ते सर्वांची नक्कल करायचे. त्यांनी एका शोमध्ये मला बोलावलं त्यांच्या सोबत एक गायिका होती. त्या गायिकेने माझं गाणं 'सत्यम शिवम सुंदरम्' गायलं.' 


दीदी पुढे म्हणाल्या, 'त्या गाण्याला रसिकांनी भरभरून दाद दिली. तेव्हा किशोर दा त्या गायिकेला म्हणाले ज्या गाण्यावर रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. तो तुझ्यासाठी नव्हता तर दीदींसाठी होता.'


रविवारी भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांचं निधन झालं आणि देश पोरका झाला. गेल्या 29 दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर एका युगाचा अंत झाला आहे.