Irrfan Khan Song of Scorpions Movie Trailer: अभिनेता इरफान खान आपल्याला तीन वर्षांपुर्वी सोडून गेला परंतु त्याच्या आठवणी आजही (Irrfan Khan New Movie Trailer) कायम आहेत. आजही आपण त्याचे चित्रपट आवडीनं पाहतो. त्यानं आपल्या अभिनयाची सुरूवात केली तेव्हा त्याचा संघर्ष सोप्पा (Irrfan Khan Struggle Story) नव्हता हळूहळू त्यानं आपला संपुर्ण प्रवास इतका रंजक केला की पाहणारेही चहित होऊ गेले. आज आपल्या सर्वांनाच इरफान खानची आठवण आल्याशिवाय राहत नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2020 साली अभिनेता इरफान खानचा 'अंग्रेजी मीडियम' (Angrezi Medium) हा चित्रपट आला त्यानंतर पुढच्याच महिन्यात त्याचे निधन झाले. येत्या 29 एप्रिलला इरफान खानला जाऊन तीन वर्षे पुर्ण होतील. 'अंग्रेजी मीडियम' नंतर 'सॉंग ऑफ स्कॉर्पिअन' (Song of Scorpions) हा त्याच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. (late bollywood actor irrfan khan new movie trailer song of Scorpions goes viral)


'द साँग ऑफ स्कॉर्पिअन' या चित्रपटाच्या निमित्तानं इरफान खानला पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर पाहण्याची संधी मिळणार आहे. हा चित्रपट इरफान खानच्या तिसऱ्या स्मृतीदिनाच्या एक दिवस आधी म्हणजे 28 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची पहिली झलक इरफान खानचा मुलगा बाबिल खान (Babil Khan Instagram) यानं इन्टाग्रामवरून शेअर केली आहे. या व्हिडीओखाली अनेकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया आल्या आहेत. अभिनेता इरफान खानचा अभिनय तो गेल्यानंतरही किती जिवंत वाटतो याचा दाखला या ट्रेलरमधून प्रेक्षकांना पुन्हा अनुभवायला मिळतो आहे. 


कसा असेल 'द सॉंग ऑफ स्कॉर्पिअन' या चित्रपटातून इरफान हा एका उंट व्यापाऱ्यांपैंकी एक आहे. तो त्या व्यापाऱ्याची भुमिका करताना दिसेल. यामध्ये तो नूरन नावाच्या एका सुंदर मुलीच्या प्रेमात पडतो. सॉंग ऑफ स्कॉर्पिअन नावाची प्राचीन उपचार पद्धती तिच्या आज्जीकडून शिकते आहे. तिच्या आज्जीचं नावं झुबेदा असं आहे. ही पद्धत तुम्हीही पहिल्यांदाच ऐकली असेल. याचा अर्थ असा की, प्रचलित दंतकथेनुसार, जर एका व्यक्तीला एखाद्या विंचूनं कोणाला दंश केला तर त्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो परंतु त्या व्यक्तीला सॉंग ऑफ स्कॉर्पिअन गाऊन गायक त्या मृत्यूच्या छायेतील व्यक्तीला बरं करू शकतो. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


या चित्रपटाचा लुक खूपच क्लासी दिसतो आहे. इरफानची भुमिकाही या ट्रेलरमध्ये प्रचंड क्लासी दिसतो आहे. या व्हिडीओखाली प्रेक्षकांच्या आणि चाहत्यांच्या सकारात्मक कमेंट्स येताना दिसत आहेत. इरफान आपल्याला सोडून गेला परंतु त्याची कला आपल्यासाठी सोडून गेला अशी एका युझरनं कमेंट केली आहे. अनेकांनी हा ट्रेलर पाहून (Song of Scorpions Video Trailer) इरफानची आठवण काढली आहे. तर अनेकांनी त्याच्या अभिनयाचे कौतुक केले आहे.