Laxmikant Berde Viral Video: मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांचे नाव हक्कानं घेतलं जातं. आजही लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde Fans) यांचे चाहते खूप आहेत. त्यांच्या बद्दल आजही आपुलकीनं लिहिलं, बोललं जातं. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मराठीच नाही हिंदी चित्रपटसृष्टीतही आपलं नावं कमावलं आहे. त्यांचे अनेक नामवंत मराठी चित्रपट हे आजही लोकप्रिय आहेत. लक्ष्मीकांत बेर्डे यांचे काही जुने व्हिडीओज (Laxmikant Berde Old Videos) हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यापैंकी असाच एक जूना व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. त्यात अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासह सुत्रसंचालक शेखर सुमन (Laxmikant Berde and Shekhar Suman) दिसत आहेत. हा व्हिडीओ वीस एक वर्षांपुर्वी लागणाऱ्या एका टॉक शोमधला आहे. यामध्ये अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे शेखर सुमन यांच्या काही हटके प्रश्नांवर उत्तर देताना दिसत आहेत. (Laxmikant Berde old video goes viral where in the talk show host shekhar suman asks him question whether he gets attracts towards his heriones or not)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मुलाखतीत शेखर सुमन लक्ष्मीकांत बेर्डे यांना अनेक प्रश्न विचारताना दिसत आहेत. यामध्ये ते पहिला प्रश्न लक्ष्मीकांत बेर्डे यांना विचारतात की, अनेकदा असं होतं की चित्रपटाचा नायक हा त्या नायिकेच्या प्रेमात (Laxmikant Berde and Shekhar Suman Interview) पडतो. तुम्हाला तसा काही अनुभव आहे का? त्यावर लक्ष्मीकांत बेर्डे म्हणतात, मराठीमध्ये तर असं फारसं होत नाही, त्यामुळे मला अनुभव नाही यावर, त्यावर शोमध्ये उपस्थित सगळेच हसतात. 


लक्ष्मीकांत बेर्डे पुढे म्हणतात की, मराठीमध्ये फारसे आकर्षणाचे (Romantic Scenes in Marathi Movie) सीन नसतात, सगळे दुरूनच तर करतात. या त्यांच्या उत्तरावर शेखर सुमन त्यांना विचारतात की, मग तुम्ही दिग्दर्शकाला विनंती करता का की जरा जास्त जवळ जाता येईल या अर्थानं नायिकेच्या, तेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे म्हणतात, मग तो दिग्दर्शकच म्हणेल की तुम्ही सीन कराल तर मी काय मेलोय का? यावर शेखर सुमन आणि लक्ष्मीकांत बेर्डे दोघंही हसतात. पुढे शेखर सुमन लक्ष्मीकांत बेर्डे यांना प्रश्न विचारता की, तुम्हाला कधी तुमच्या नायिकेबद्दल आकर्षण वाटते का, त्यावर लक्ष्मीकांत बेर्डे म्हणतात की, जे आपल्याला मिळणारच नाहीये त्याकडे पाहयचे तरी कशाला? यावर सगळेच हसतात. सध्या हा व्हिडीओ सगळीकडेच व्हायरल होतो आहे. 


मराठी इंडस्ट्री आता खूप मोठ्या प्रमाणात जागतिक स्तरावर (Marathi Movies) आपलं नावं कमावते आहे. त्यामुळे या इंडस्ट्रीचे सगळीकडेच कौतुक होताना दिसते आहे. आपला मराठी चित्रपट हा सर्वच माध्यमांतून जगभरातील प्रेक्षक पाहतो आहे. यामध्ये मराठी चित्रपटसृष्टी विकसित होणारा नाना तऱ्हेचा आशय आज ग्लोबल (Global Audience) झाला आहे.



नाटक, सिनेमा, सिरियल्स अथवा वेब सिरिज किंवा रिएलिटी शो (Reality Show) यांपैंकी सगळ्यांचे माध्यमावरून मराठीतला विविध प्रकारचा आशय पाहणारा प्रेक्षकवर्ग (Marathi Audience) तयार झाला आहे. DJ Akki नावाच्या एका युट्यूबरनं हा व्हि़डीओ शेअर केला आहे.