मुंबई : मराठी सिनेसृष्टीत सध्या लग्नांची लगबग आहे. नुकताच सिद्धार्थ आणि मितालीचा लग्नसोहळा पार पडला. काही दिवसात आस्ताद काळे आणि स्वप्नाली पाटील हे देखील लग्नबंधनात अडकणार आहेत. यातच आणखी एका व्यक्ती प्रेमात पडल्याची चर्चा रंगली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठी सिनेसृष्टील दिवंगत लोकप्रिय अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची मुलगी स्वानंदी बेर्डे  (Swanandi Berde is in Love?) हीच्या नावाची जोरदार चर्चा रंगली आहे. स्वानंदी सोशल मीडियावर भरपूर 
ऍक्टिव असते. अशीच एक पोस्ट सध्या चर्चेत आहे. या पोस्टमुळे स्वानंदी प्रेमात आहे की काय? असा प्रश्न साऱ्यांना पडला आहे. 



स्वानंदीने एका मुलासोबतच फोटो पोस्ट केला आहे. या फोटोतील तरूणाचे नाव प्रेम मोदी. या तरूणासोबत स्टायलिश पोझ देताना दिसत आहे. यासोबत तिने अतिशय सुंदर पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमुळे सगळ्यांच्याच नजरा टिकून राहिल्या आहेत. 



स्वानंदी या पोस्टमध्ये म्हणते की,'तुझ्या चेहऱ्यावरचं हास्य पाहण्यासाठी मी काहीही करू शकते. आयुष्यातील कठीण काळात आपण अधिक जवळ आलो. आता तुझी इतकी सवय झाली आहे की एकटीला भीती वाटते. खूप प्रेम.....' या पोस्टमुळे स्पष्ट होतंय की स्वानंदी प्रेमात पडली आहे.



यावर प्रेम मोदीने देखील सुंदर रिप्लाय केला आहे. स्वानंदीसोबतचा फोटो शेअर करत त्यांने गोड पोस्ट लिहिली आहे.