Leonardo Dicaprio Dating Neelam Gill: मनोरंजनसृष्टीत चर्चा असते ती म्हणजे लव्ह आणि रिलेशनशिप्सची. कोण कधी कोणाला डेट करेल याचा काहीच नेम नाही. त्यामुळे सोशल मीडियावर फक्त त्यांची चर्चा रंगलेली असते. सध्या बॉलिवूडमध्ये चर्चा रंगली आहे ती म्हणजे अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांची. स्पेनच्या ट्रीपपासून त्या दोघांची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. स्पेनवरून आल्यानंतरही ते दोघं एकमेकांसोबत स्पॉट झाले आहेत त्यामुळे ते एकमेकांना डेट करत असल्याची चांगलीच चर्चा आहे. त्यातून त्यांच्या लव्ह लाईफवर आता शिक्कामोर्तबही नेटकऱ्यांनी केल्याचे दिसून येते आहे. आता त्याच पार्श्वभुमीवर त्यांनी मात्र काहीही खुलासा केलेला नाही. अनेकदा असेच होते, अशाच बॉलिवूडच्या लोकप्रिय कलाकरांच्या फोटांची चर्चा असते आणि मग त्यांच्या डेटिंगची चर्चा रंगते मग ते खुलासा करतात की... डेट करत आहेत किंवा नाही पण त्यालाही बराच वेळ लागतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे काहीही असलं तरीसुद्धा यावेळी एका सुप्रसिद्ध मॉडेलनं मात्र याचा खुलासा केला आहे. मागच्याच महिन्यात टायटॅनिकचा अभिनेता लिओनार्डा डायकॅपेरिओच्या डेटिंगची चर्चा सुरू झाली होती. तो भारतीय वंशाच्या ब्रिटिश मॉडेल नीलम गिलला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यावेळी ते दोघं हे एका हॉटेलच्या बाहेर एकत्र स्पॉट झाले होते. त्यामुळे ते दोघं एकमेकांना डेट करत आहेत का याची जोरात चर्चा सुरू झाली होती. यावेळी त्या दोघांपैंकी कोणीही त्यावर चक्कार शब्द हा काढला नव्हता. परंतु त्यानंतर त्यांच्या डेटिंगच्या चर्चा या शमल्यानंतर मात्र पुन्हा एकदा त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं आहे आणि यावेळी नीलम गीलनं खुलासा केला आहे त्यामुळे सगळ्यांच्याच नजरा वळल्या आहेत. यावेळी तिनं आपल्या इन्टाग्राम स्टोरीवरून एक धक्कादायक खुलासा केला आहे. 


हेही वाचा - 'तो माझ्याकडे प्रेमाची भिक मागायचा' कपूर कुटुंबियाच्या लेकावर कंगनाचा निशाणा


लिओनार्डा डायकॅपेरिओ हा जगातला सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता आणि तरूणींच्या गळ्यातला ताईत आहे. त्यामुळे अभिनेत्रीचं काय किंवा त्याच्या सहकलाकारचं काय जगातील प्रत्येक तरूणीला डेट करावासा वाटेल असा हा अभिनेता आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली असते. परंतु चक्क नीलम गीलनं आपल्या त्याच्यासोबत डेटिंगच्या चर्चा रंगत असल्या तरी त्या चर्चांचा दुरूपयोग करत तिनं खोटं लपवलं नाही तर ती त्याला डेट करत नाहीये हे जाहीर करून टाकलं आहे. 



सध्या तिच्या इन्टाग्राम स्टोरीनं सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. काही दिवसांपुर्वी ते दोघं पुन्हा एकदा स्पॉट झाले होते. त्यामुळे त्यांची परत एकदा चर्चा रंगलेली होती. त्यावर आता तिनं क्लॅरिफिकेशन दिलं आहे. ती म्हणाली आहे की, ज्या अफवा रंगल्या आहेत त्यातून मी स्पष्टीकरण देऊ इच्छिते की मी लिओनार्डो डायकेपेरिओची नवी गर्लफ्रेंड नाही. तर गेल्या अनेक महिन्यांपासून मी त्याच्या जवळच्या मित्राला डेट करते आहे. आम्ही गेल्या काही दिवसांपासून एकत्र दिसतो आहोत याचे कारण तेच आहे की मी त्याच्या मित्राला डेट करते आहे. मला पुर्ण आशा आहे की मी तुमच्या या प्रश्नांची उत्तरं दिली आहे.