मुंबई : साऊथ  सुपरस्टार विजय देवरकोंडा लवकरच बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे.  'Liger' या चित्रपटात तो दिसणार आहे. या चित्रपटात विजयसोबत अनन्या पांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकतच अनन्या आणि विजयने सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. आता चाहते त्याच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. विजय आणि अनन्याची नुकतीच एका पार्टीत भेट झाली होती. ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये विजय आणि अनन्या एकमेकांशी बोलण्यात हरवल्याचं दिसत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अपूर्वा मेहताच्या बर्थडे पार्टीला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली. ज्यामध्ये कतरिना कैफ-विकी कौशल, करण जोहर, अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा यांचा सहभाग होता. विजय आणि अनन्या दोघंही ब्लॅक कलरच्या आउटफिटमध्ये दिसतायेत. दोघांचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोघंही गप्पा मारण्यात मग्न असल्याचं दिसत आहेत. व्हिडिओ रेकॉर्ड होत असल्याचं पाहून दोघंही सावध होतात आणि फोटोसाठी पोझ देऊ लागतात.


विजय आणि अनन्याचा व्हिडिओ व्हायरल
विजय आणि अनन्याचा हा व्हिडिओ अभिनेता-निर्माता चार्मी कौरने शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत चार्मीने लिहिलयं की, माझं जबरदस्त 'Liger'कपल. मी तुम्हा दोघांवर प्रचंड प्रेम करतो. विजय आणि अनन्याला एकत्र पाहून चाहते खूप खुश झाले आहेत. चार्मीच्या पोस्टवर चाहते  कमेंटचा वर्षाव करत आहेत. अनन्याचा हा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


'Liger'बद्दल सांगायचं झालं तर, या सिनेमात अनन्या आणि विजयसोबत दिग्गज बॉक्सर माइक टायसनचा खास कॅमिओ दिसणार आहे.  हा सिनेमा 25 ऑगस्ट 2022 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.