मुंबई : आजकाल विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे त्यांच्या आगामी 'लाइगर' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. दोघंही सातत्याने चित्रपटाचं ठि-ठिकाणी प्रमोशन करत असतात. या चित्रपटाद्वारे विजय बॉलिवूडमध्ये त्याच्या करिअरला सुरुवात करणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का? की प्रमोशनमध्ये विजय एक साधं चप्पल घावून का फिरत आहे? एवढंच नाही तर या चप्पलची किंमत खूप महाग नाही तर फक्त 199 रुपये किमतीची चप्पल घालून विजय देवरकोंडा त्याच्या आगामी चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. पण असं का?
 
विजयची खास चप्पल
विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांचा 'लाइगर' हा चित्रपट या महिन्यात २५ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. विजय आणि अनन्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. मात्र या प्रमोशनमध्ये विजय देवरकोंडाची चप्पल प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. एका कार्यक्रमात तो पहिल्यांदा चप्पल घालताना दिसला. तेव्हा रणवीर सिंगचं लक्ष त्याच्या चप्पलकडे गेलं आणि तेव्हापासून त्याच्या 199 रुपयांच्या चप्पलने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. विजय आता प्रत्येक कार्यक्रमात तीच चप्पल घालताना दिसतोय. आता यामागचं कारण समोर आलं आहे.



विजयचं एक्सपेरिमेंट
विजय देवरकोंडा त्याच्या प्रमोशनमध्ये मुख्यतः टी-शर्ट, चप्पल आणि सामान्य पॅंट किंवा जॉगर्समध्ये दिसतो. यावेळी विजय पूर्णपणे रिलॅक्स लूकमध्ये दिसत आहे. एका वृत्तानुसार, विजयची स्टायलिस्ट हरमन कौरने सांगितलं आहे की, विजय हा मुद्दाम असं करत आहे कारण त्याला प्रमोशनमध्ये त्याचा लूक चित्रपटाच्या पात्रासारखाच ठेवायचा आहे. हरमनने सांगितलं की, विजयने प्रमोशनल लूकसाठी खास या चप्पल ऑर्डर केल्या आहेत.