सलमानप्रमाणेच `या` गायिकेलाही सर्पदंश; व्हिडीओ पाहून उडेल थरकाप
मागच्याच आठवड्यामध्ये तिनं ...
Snake Bite Video: सलमान खानच्या वाढदिवसांच्या चर्चा जोर धरणार, तोच त्याला सर्पदंश झाल्याच्या धक्कादायक बातमीनं सर्वांना हादरवलं. पनवेल येथील फार्महाऊसवर असतानाच तिथं सलमानसोबत हा अपघात घडला. कालांतरानं चाहत्यांनी लगेचच त्याच्याबाबत चिंता व्यक्त करण्यास सुरुवात केली.
सलमानला तातडीनं रुग्णालयातही नेण्यात आलं. जिथं त्याला निरीक्षणासाठी ठेवण्यात आलं होतं. असंच काहीसं एका पॉप गायिकेसोबतही घडलं.
पॉप सिंगर माएटा (Pop singer Maeta)नंही अशाच प्रसंगाचा सामना केला. एका म्युझिक व्हिडीओदरम्यान तिला सर्पदंश झाला होता.
मागच्याच आठवड्यामध्ये तिनं या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता.
माएटानं जे जेड च्या लेबल रोक नेशन (Jay Z's label Roc Nation) साठी साईन केलं. जिथं तिच्या अवतीभोवती अनेक साप दिसत होते.
तिला त्यावेळी कल्पनाही नव्हती, तोच एका सापानं तिच्या हनुवटीवर दंश दिला.
हा व्हिडीओ इतका धक्कादायक होता की पाहताना थरकापच उडेल. माएटा सर्पदंशाच्या वेदना असह्य झाल्यामुळं ती फ्रेममधून बाहेरच पडली.
माएटासोबत घडलेल्या या प्रसंगाच्या व्हिडीओला प्रचंड व्ह्यूज मिळाले आहेत. मुख्य म्हणजे कलाकारांनी कलेसाठी ओलांडलेल्या काही मर्यादा या त्यांच्या जीवावर नेमक्या कशा बेतू शकतात हेच दाहक वास्तव असे व्हिडीओ सांगून जात आहेत.