मुंबई : देशभरात आज लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. या तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये केंद्र सरकारने काही नियम शिथिल करण्याचा निर्णय घेतला. तसेच राज्यांनी झोननुसार काही प्रमाणात नियम शिथिल करण्याचे देखील निर्णय घेतले. या बदललेल्या नियमांमध्ये दारूची दुकानं सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दी़ड महिना दारूपासून लांब असलेले तळीराम अगदी सकाळपासून दारूची दुकानं उघडणार म्हणून लांबच लांब रांगेत उभे राहिलेले आपण पाहिले. दारूच्या मोहापोटी यांना अगदी सोशल डिस्टन्शिंगचा देखील विसर पडला. (वाईन शॉप बाहेर मद्यप्रेमींनी मोठी गर्दी केल्याने नाशिकमध्ये मद्यविक्री बंद) 


 


देशभरात कोरोनाच सावट वाढत आहे. दोनवेळा लॉकडाऊन करूनही कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा आटोक्यात येत नाही. असं असताना सरकारने आता मद्यविक्रीला सुरूवात केल्यामुळे सर्व मेहनतीवर पाणी फेरणार अशी बोंब ही एकाबाजूने केली जात आहे. असं असताना लेखक आणि दिग्दर्शक क्षितीज पटवर्धनने या परिस्थितीवर आपलं परखड मत मांडलं आहे. 


व्यसनाला असलेली भिकार प्रतिष्ठा आणि सो कॉल्ड कुलनेस सगळ्यांना घेऊन बुडणार एक दिवस. किलोमीटर भर रांगा लागल्यात दारूच्या दुकानाबाहेर!!

Posted by Kshitij Patwardhan on Sunday, May 3, 2020

‘व्यसनाला असलेली भिकार प्रतिष्ठा आणि सो कॉल्ड कुलनेस सगळ्यांना घेऊन बुडणार एक दिवस. किलोमीटर भर रांगा लागल्यात दारूच्या दुकानाबाहेर,’ अशी पोस्ट क्षितिजने फेसबुकवर लिहिली आहे.


कोरोनाशी दोन हात करण्यासाठी घरी राहणं सर्वात महत्वाचं आहे. आणि बाहेर पडल्यास सोशल डिस्टन्शिंगचे नियम पाळणं देखील अत्यंत महत्वाचं आहे. असं असताना सगळे नियम धाब्यावर बसवत नागरिक दारू खरेदीसाठी जो हुल्लडपणा गाजवत आहेत. त्या विरोधात क्षितीज पटवर्धनने आपलं परखड मत सोशल मीडियावर शेअर केले आहे.