मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री लीजा हेडन  (Lisa Haydon) ने तिसऱ्यांदा आनंदाची बातमी दिली आहे. लिसाने अतिशय हटके अंदाजाच आपल्या बाळंतपणाची माहिती सोशल मीडियावर दिली. गोंडस मुलीला जन्म दिल्यानंतर लिसाने आपल्या ऑफिशिअल अकाऊंटवर नाही तर एका चाहत्याच्या कमेंटवर आपली गुड न्यूज दिली आहे. चाहत्याने इंस्टाग्रामवर लिसाला विचारलं की, तुमचं तिसरं बाळं कुठे आहे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


लिसाने चाहत्याच्या कमेंटवर रिप्लाय देताना म्हटलं,'माझ्या कुशीत.' लिसाची ही प्रतिक्रिया वाचून चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. फेब्रुवारी 2021 मध्ये लिसाने सोशल मीडियावर आपल्या तिसऱ्या गरोदरपणाची माहिती दिली. जूनला तिने आपल्या तिसऱ्या बाळाला जन्म दिला. यावेळी लिसाने मुलगा जॅकसमवेत एक व्हिडिओही पोस्ट केला होता, ज्यात तिने आपल्या तिसऱ्या मुलाचे लिंग देखील सांगितले आणि सांगितले की तिला मुलगी होणार आहे. त्या काळापासून लिसा आपल्या बेबी बम्पसह सोशलवर बरीच छायाचित्रे शेअर करत आहे. मीडिया. होता काही दिवसांपूर्वी तिने आपल्या बेबी शॉवरची छायाचित्रेही सोशल मीडियावर शेअर केली होती.



लिसाने लंडनमधील बिझनेसमन दिनो लालवानीशी २०१६ मध्ये लग्न केले होते. दोघांचेही फूकेटमध्ये डेस्टिनेशन वेडिंग होते. यानंतर, 2017 मध्ये त्यांचा पहिला मुलगा जॅकचा जन्म झाला. यानंतर 2020 मध्ये मुलगा लिओचा जन्म झाला. लिशाने 'आयशा' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. ती शेवटची 'ऐ दिल है मुश्किल' चित्रपटात दिसली होती.