लीजा हेडनचा नवा लूक... सोशल मीडियावर ट्रोलिंग!
`क्वीन` आणि `शौकीन`सारख्या सिनेमांत दिसलेली लीजा हेडन सध्या बॉलिवूडपासून दूर असली तरी सध्या ती पुन्हा एकदा चर्चेत आलीय... याचं कारण म्हणजे तिचा नवीन लूक... सोशल मीडियावर या लूकमुळे ट्रोलर्सनं तिला फैलावर घेतलंय.
मुंबई : 'क्वीन' आणि 'शौकीन'सारख्या सिनेमांत दिसलेली लीजा हेडन सध्या बॉलिवूडपासून दूर असली तरी सध्या ती पुन्हा एकदा चर्चेत आलीय... याचं कारण म्हणजे तिचा नवीन लूक... सोशल मीडियावर या लूकमुळे ट्रोलर्सनं तिला फैलावर घेतलंय.
नुकतीच 'आई' बनलेल्या लिजानं एक नवा लूक ट्राय केलायय. तिनं आपल्या केसांचा रंग संपूर्णत: बदलून टाकलाय.
लिजानं आपल्या या नव्या लूकसहीत एक फोटोशूट केलंय... आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिनं यातले काही फोटो शेअर केलेत. तिच्या केसांचा पांढरा रंग पाहून सोशल मीडियावर तिची चेष्ठा केली जातेय.
काही असलं तरी लिजा 'स्टनिंग' दिसते हे मात्र मान्य करावं लागेल... तुम्हाला काय वाटतं...?