मुंबई : निखील अडवाणी यांच्या दिग्दर्शखाली साकारण्यात आलेल्या 'बाटला हाऊस' चित्रपटाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. १५ ऑगस्ट रोजी रूपेरी पडद्यावर दाखल झालेल्या 'बाटला हाऊस'ने २४ करोड रूपयांपर्यंत मजल मारली आहे. चित्रपटामध्ये अभिनेता जॉन अब्राहम एसीपी संजीव कुमार यादव यांच्या भुमिकेत झळकताना दिसत आहे. त्याचप्रमाणे त्याच्या अभिनयाचे कौतुकही सर्व स्तरातून केले जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जॉनने पाकिस्तानमध्ये बंदी घालण्यात आलेल्या भारतीय चित्रपटांबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'सर्वप्रथम भारतच... ', अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे. सर्वात आधी पाकिस्तानने भारतीय चित्रपटांवर बंदी घातल्याविषयी प्रतिक्रिया जॉनने दिल्या आहेत. 


दुसरीकडे गायक कैलाश खैर यांनी भारताला याचा काही फरक पडत नसल्याचे सांगीतले. ते म्हणाले की, 'पाकिस्तानने भारतीय चित्रपटांवर बंदी घातल्याचा आम्हाला काही फरक पडत नाही. देवाच्या कृपेने आमच्या मातृभूमीला विकसित करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत.'


त्याचप्रमाणे ते पुढे म्हणाले, 'त्यामुळे भारतीय चित्रपटांवर बंदी घालणे आमच्यासाठी फारसं महत्वाचं नाही. यात पाकिस्तानचं मोठं नुकसान आहे.' अशा प्रतिक्रिया प्रसिद्ध गायक कैलाश खैर यांनी दिल्या आहेत. 


'बाटला हाऊस' चित्रपटात जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत दिसणार आहे. जॉनसोबत अभिनेत्री मृणाल ठाकूरही दिसतेय. यापूर्वी प्रदर्शित झालेल्या 'रोमियो, अकबर, वॉल्टर' या चित्रपटात जॉन अब्राहमनं एका 'रॉ' एजन्टची भूमिका निभावली होती.