मुंबई : दरवर्षी येणारा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा म्हणजे प्रेक्षकांसाठी एकप्रकारे ट्रीटचं असते. नुकताच फिल्मफेअर अवोर्ड मोठ्या थाटामाटात पार पडला. यंदा दोन मोठ्या आणि सर्वाधिक गाजलेल्या चित्रपटामध्ये चुरस पाहायला मिळाली आहे. सगळ्यात आकर्षणाची गोष्ट म्हणजे या सोहळ्याच्या रेड कार्पेटची असते. फिल्म फेअर रेड कार्पेटवर सेलिब्रीटी ग्लॅमरस अंदाजात येतात. मात्र काही कलाकार या यादीत येत नाहीत. बॉलिवूडमध्ये असे काही सेलिब्रिटी आहेत ज्यांना ग्लॅमरसपेक्षा काहीतरी अतरंगी परिधान करायला आवडतं. या यादीत रणवीर सिंह, उर्फी जावेद तर आहेतच मात्र या दोघांना टक्कर देणाऱ्या एका अभिनेत्याचा एक व्हिडीओ सध्या सोशलम मीडियावर धुमाकूळ घालत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकत्याच समोर आलेल्या व्हिडीओमध्ये एक अभिनेता अतरंगी स्टाईलमध्ये दिसत आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून 'अधुरा' फेम साहिल सलाथिया (Sahil Salathia) आहे. एमॅझोन प्राईमवर रिलीज झालेली अधुरा या वेबसिरीजमध्ये तो मुख्य भूमिकेत दिसला होता. नुकतीच त्याने फिल्म फेअरच्या रेड कार्पेटवर हजेरी लावली होती. यावेळी त्याच्या फॅशनसेन्स पाहून  मात्र ट्रोलर्स त्याचा चांगलाच क्लास घेत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणऱ्या व्हिडीओत तो काळ्या रंगाच्या ब्लेजरमध्ये दिसत आहे. याचबरोबर ब्लेजरच्या आत पांढरा शर्ट आणि टाय परिधान केला आहे. मात्र यावर त्याने शॉर्ट पँन्ट घातल्यामुळे त्याची फॅशन पाहून त्याची तुलना उर्फी जावेदसोबत केली जात आहे.


अनेकांनी त्याच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत त्याचा चांगलाच क्लास घेत आहेत. एका ट्रोलरने कमेंट करत लिहीलं आहे की, बस्स एवढा कॉन्फिडन्स हवा आयुष्यात. तर अजून एकाने लिहीलंय, हा तर खरंच अधूरा निघाला. तर अजून एकाने लिहीलंय, उर्फी जावेदचा छोटा भाऊ सापडला. तर अजून एकाने म्हटलंय, आता हा कार्टून कोण? तर अजून एकजण म्हणतोय, शाळेत जायच्या ऐवजी ईथे आला. तर अजून एकाने लिहीलंय, हा तर रणवीर सिंहचा ज्युनिअर आहे. अशा अनेक प्रकारच्या कमेंट करुन तिला ट्रोल केलं जात आहे. सध्या सोशल मीडियावर या अभिनेत्याचा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


साहिलने काहीतरी अतरंगी परिधान करण्याची ही काही पहिली वेळ नाही याआधी अभिनेता बऱ्याचदा असं काही तरी अतरंगी परिधान करताना दिसला आहे. यावेळी ब्लेजरवर घातलेल्या शॉर्ट्समुळे तो चर्चेत आहे. जम्मूमध्ये राहणाऱ्या साहिलने ऐवरेस्ट या शोमधून डेब्यू केला. तो त्याच्या मॉडेलिंगमधून सगळ्यांचाच भुवया उंचावतो.