मुंबई : सोशल मीडियावर बॉलिवूड कलाकार नेहमीच चर्चेत असतात. कारण त्यांना फॉलो करणाऱ्या लोकांची संख्या सोशल मीडियावर अधिक आहे. आपल्या आवडत्या सेलिब्रिटीबद्दल जाणून घेण्याची इच्छा प्रत्येक चाहत्यामध्ये असते. चाहते सेलिब्रिटींच्या छोट्या छोट्य़ा गोष्टींकडे देखील उत्सूकतेने पाहत असतात. कधी कधी सेलिब्रिटी स्वत:च त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून स्वत:बद्दलचे अपडेट्स देत असतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींचे बालपणीचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत असताना दिसतात. ते पाहून त्यांच्या चाहत्यांसाठी त्यांना ओळखणे कठीण होते. अशाच एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसत आहे.


सोशल मीडियावर एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अमिताभ बच्चन सूट आणि टाय घालून हात बांधून एका कार्यक्रमात बसलेले दिसत आहेत. त्याच्या शेजारी एक मुलगीही बसली आहे आणि ती कॅमेराकडे पाहत आहे. ही गोंडस मुलगी कोण आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 



निरागस दिसणारी ही मुलगी आज बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने एकापेक्षा अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. जर तुम्ही अद्याप या मुलीला ओळखू शकला नसेल, तर आम्ही तुम्हाला एक छोटीशी हिंट देत आहोत. तिने सलमान खान सोबत असलेल्या पत्थर के फूल या चित्रपटातून तिच्या बॉलिवूड करिअरची सुरुवात केली.



अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या या ब्लॅक अँड व्हाइट फोटोमध्ये दिसणारी ही मुलगी दुसरी कोणी नसून बॉलिवूडची अभिनेत्री रवीना टंडन आहे. 1994 साली प्रदर्शित झालेल्या मोहरा चित्रपटातून तिला प्रसिद्धी मिळाली. रवीना टंडन आज 47 वर्षांची झाली आहे, परंतु तिचे सौंदर्य आणि तिची फिटनेस अजूनही अनेक अभिनेत्रींना मागे टाकते. रवीना टंडन साऊथ सुपरस्टार यशचा चित्रपट KGF 2 मध्ये दिसली होती.