मुंबई : लोककलेचा वारसा जपणारा भारूड सम्राट निरंजन भाकरे यांचे कोरोनाने निधन झाले आहे. अभिनेत्री मेघा घाडगे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. लोककलेत 72 बहुरूपींच्या कला आहेत. त्यातील अनेक लोककला लोप पावत चालल्या आहेत. असं असताना भारूडकार निरंजन भाकरे यांनी भारूडाची कला जोपासली. 'बुरगुंडा' हरपला अशी भावना व्यक्त केली जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या भारूडामधुन समाज प्रबोधन करणारा आमचा कलाकार करोनाने संपवला, अशी भावना मेघा घाडगेने व्यक्त केली आहे. 


बुरगुंडा हरवला ..भारूड सम्राट "निरंजन भाकरे"काका ...!! आख्या महाराष्ट्राला आपल्या भारूडा मधुन समाज प्रबोधन करणारा आमचा कलाकार करोनाने संपवला...

Posted by Megha Ghadge on Friday, April 23, 2021

निरंजन भाकरे यांना कलेचा वारसा हा कुटुंबातूनच मिळाला. त्यांचे वडील जुने नाटकर्मी होते. त्यांनी आतापर्यंत अनेक नाटकात काम केलं आहे. निरंजन भाकरे लहानपणी ग्रामीण भागात नाटकात भूमिका करत. तसेच कलापथकात हार्मोनियम देखील ते वाजवत. अशोक परांजपे यांची मुलाखत वाचून निरंजन भारावले आणि त्यांच्या भेटीनंतर तर त्यांचं संपूर्ण आयुष्यच बदलला असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. भारूडाने मला गारूड घातले ते आयुष्यभरासाठीच, असं ते म्हणतं. 


निरंजन भाकरे यांनी भारूड सातासमुद्रापार पोहोचवले. अमेरिका, मलेशिया, थायलंडमध्ये त्यांचे कार्यक्रम देखील झाले आहेत. तसेच गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्येही त्यांची नोंद झाली आहे. त्यांच्या या यशात त्यांच्या पत्नीचा आणि मुलाचा मोठा वाटा असल्याचं ते अनेकदा सांगत.  आज त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.