मुंबई : बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये सलमान त्याच्या भाच्या सोबत खेळताना दिसत आहे. हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. सलमान बहिण अर्पिताच्या मुलासोबत खेळताना दिसत आहे. आहिलसह मस्ती करताना हा व्हिडिओ सलमानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. ३१ लाखांपेक्षा जास्त चाहत्यांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.




गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या सलमानच्या 'भारत' चित्रपटाने चांगलीच कामगिरी केली आहे. सलमानने ५ जून रोजी ईदच्या मुहूर्तावर चित्रपट प्रदर्शित करून चाहत्यांना चांगलीच ईदी दिली. चित्रपटात सलमान शिवाय दिशा पाटनी, कतरिना कैफ यांनी भूमिका साकारली होती. 'भारत' चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर सलमान त्याच्या 'दबंग ३' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.