मुंबई : 'लव सेक्स और धोका' या विषयी बऱ्याचवेळा अनेक लोकं त्यांचा अनुभव सांगताना दिसतात. एवढंच काय तर बऱ्याच बॉलिवूड चित्रपटांमध्ये हा विषय दाखवण्यात आला आहे. तर काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये हा विषय दाखवताना बोल्डनेसच्या सगळ्या हद्द पार करण्यात आल्या आहेत. चला तर पाहूया हे कोणते चित्रपट आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऐतराज 
अक्षय कुमार, करिना कपूर आणि प्रियांका चोप्रा यांचा 'ऐतराज' हा चित्रपट २००४ साली प्रदर्शित झाला होता. चित्रपटात लव सेक्स और धोखा सोबतच एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरही दाखवण्यात आलं आहे. चित्रपटात, प्रियांका अक्षयसोबत रिलेशनशिपमध्ये असते आणि नंतर प्रेग्नंट झाल्यानंतर ती गर्भपात करते. तिची स्वप्न पूर्ण करत श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी ती अक्षयची फसवणूकही करते.


हेट स्टोरी
चित्रपटात पाओली दाम मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत बांधून ठेवतो. तुम्ही हा चित्रपट MX Player वर पाहू शकता.


गहराईया 
या चित्रपटात दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्यात प्रेम, सेक्स आणि फसवणुकी दाखवण्यात आली आहे. दीपिका तिच्या प्रियकराची फसवणूक करत सिद्धांतशी संबंध बनवते आणि नंतर सिद्धांतसोबत रिलेशनशिपमध्ये असताना त्याची ही फसवणूक करते.


जूली 
नेहा धुपियाने या चित्रपटाच्या पोस्टरमुळे खळबळ उडवून दिली होती. प्रेम, सेक्स आणि फसवणुकीचा अँगल दाखवण्यासाठी चित्रपटात खूप बोल्डनेस दाखवण्यात आला आहे. हा चित्रपट तुम्ही Hotstar वर पाहू शकता.


लव्ह सेक्स और धोखा 
राजकुमार रावचा हा चित्रपट LSD म्हणूनही ओळखला जातो. IMDb ने चित्रपटाला 10 पैकी 7.2 रेटिंग दिले. चित्रपटाच्या शीर्षकावरून त्याची कथा स्पष्टपणे समजते. हा चित्रपट तुम्ही Jio सिनेमावर पाहू शकता.