मुंबई : प्रेम एक अशी भावना आहे ज्यामध्ये माणूस कोणतीही किंमत मोजण्यासाठी तयार होतो. कुटुंब जरी विरोधात असेल तरी त्या खास व्यक्तीसाठी सगळेचं अनेक प्रयत्न करतात. असचं काही झालं आहे निर्माते बोनी कपूर यांच्यासोबत. बोनी यांनी 1996 मध्ये पहिल्या पत्नील  घटस्फोट देऊन फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्री श्रीदेवी यांच्यासोबत लग्न केले. आता श्रीदेवी या जगात नाही, पण दोघांची लव्ह लाईफ चढ-उतारांनी भरलेली होती. बोनी कपूर यांच्या वाढदिवसाच्या खास प्रसंगी त्यांनी श्रीदेवीसोबतच्या प्रेमकथेची रंजक गोष्ट सांगितली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेव्हा बोनी कपूर यांनी 'सोलहवा सावन' चित्रपटात श्रीदेवी यांना पहिल्यांदा पाहिले. तेव्हा श्रीदेवी यांच्याकडून बोनी कपूर यांना हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर बोनी यांनी भाऊ अनिल कपूर आणि श्रीदेवी यांना 'मिस्टर इंडिया' चित्रपटात कास्ट करायचं ठरवलं. या चित्रपटात श्रीदेवी यांना कास्ट करण्याची कथाही खूप रंजक आहे. याचा खुलासा स्वतः बोनी यांनी एका मुलाखतीत केला आहे.



बोनी यांचे श्रीदेवीवर प्रेम होते, त्यामुळे कोणत्याही किंमतीत 'मिस्टर इंडिया'मध्ये त्यांना कास्ट करायचे होते, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा कोणताही मार्ग बोना यांच्याकडे नव्हता. बोनीने श्रीदेवीच्या आईशी संपर्क साधला असता, श्रीदेवीच्या आईने चित्रपटासाठी 10 लाख रुपये फी मागितली होती. आईची ही अट त्यांनी मान्य केली. एवढेच नाही तर  श्रीदेवी यांच्या आईला इम्प्रेस करण्यासाठी त्यांनी भावी सासूला 11 लाखांपर्यंत देण्याचे मान्य केले..


एकदा श्रीदेवी यांची आई आजारी असताना त्या कठीण काळात बोनी कपूर यांनी साथ दिली. श्रीदेवी यांच्या आईच्या आजारपणात आणि मृत्यूच्या काळात जवळीक वाढली. बोनी यांचा स्वभाव आणि काळजी पाहून श्रीदेवी प्रभावित झाल्या होत्या असे म्हणता येईल. श्रीदेवी बोनीचा प्रस्ताव नाकारू शकली नाही आणि दोघांनी 1996 मध्ये लग्न केले.


श्रीदेवी यांनी बोनी कपूरसोबत आयुष्याचा प्रवास पूर्ण केला नाही.  सध्या बोनी आपल्या मुली जान्हवी आणि खुशी कपूरसोबत राहतात. एवढंच नाही तर वडिलांवर नाराज असलेला अर्जुन कपूर आता जान्हवी आणि खुशी या बहिणींसोबत वेळ घालवताना दिसतो.