इच्छेविरुद्ध लग्न करण्यासाठी पालकांचा दबाव? `या` प्रसिद्ध सेलिब्रिटीच्या मूलीनं संपवलं जीवन
जाणून घ्या, कोणत्या सेलिब्रिटी ही लेक आहे...
मुंबई : प्रसिद्ध तमिळ गीतकार कबिलन (Kabilan) यांची मुलगी थुरिगाईचं निधन झाले आहे. थुरिगाईनं आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे. वृत्तानुसार, शुक्रवारी थुरिगाई तिच्याच घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. तमिळ चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी थुरिगाईच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
थुरिगाई अतिशय स्ट्रॉन्ग स्त्री होती. अशा परिस्थितीत तिनं आत्महत्या करणं तिच्या जवळच्या लोकांसाठी आणि हितचिंतकांसाठी धक्क्यापेक्षा कमी नाही. शुक्रवारी ती तिच्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळली, त्यानंतर पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी सालिगरामम येथील रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी थुरिगाईचा मोबाईल जप्त केला आहे. यासोबतच कुटुंबीयांची चौकशी करून आत्महत्येचे नेमके कारण शोधले जात आहे.
काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की थुरिगाई नैराश्याने ग्रस्त होती. कारण तिचे आई-वडील तिच्यावर लग्नासाठी सतत दबाव आणत होते. थुरिगाईचं कोणावर तरी प्रेम होते आणि तिचे आई-वडील हे नातं मान्य करत नव्हते.
रिपोर्ट्सनुसार, थुरिगाई चेन्नईच्या अरुम्बक्कम भागात राहत होती. ती एक कॉस्च्युम डिझायनर आणि लेखिका होती. दोन वर्षांपूर्वी, सप्टेंबर 2020 मध्ये, तिनं तिचं 'बीइंग वुमन' ही मॅगझिन सुरू केली, ज्याच्या लॉन्च इव्हेंटला दिग्दर्शक पीए उपस्थित होते. रंजित, चेरान आणि अभिनेत्री विमला रमण यांनी देखील हजेरी लावली. तमिळ चित्रपट उद्योगात, थुरिगाई यांनी जीव्ही प्रकाश कुमार आणि अशोक सेल्वन यांसारख्या अभिनेत्यांसाठी पोशाख डिझाइन केले. (lyricist kabilan s daughter hang her self in house chennai )
कबिलनबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी रजनीकांत, विजय, अजित आणि विक्रम या स्टार्सच्या चित्रपटांसाठी गाणी लिहिली आहेत. 45 वर्षीय कबीलन हे मूळचे पाँडिचेरीचा आहेत. त्यांनी 2000 च्या दशकात टीव्ही शो आणि चित्रपटांसाठी गीत लिहायला सुरुवात केली. त्यांनी काही चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणूनही काम केले आहे.