`मछली जल की रानी है`- यो यो हनी सिंग
जलपरी सनी लियोच्या या फोटोला यो यो हनी सिंगने `मछली जल की रानी हैं` असे कमेंट केले.
मुंबई: आपल्या गण्याच्या तालावर संपूर्ण जगाला ताल धरायला लावणारा रॅपर आणि गायक यो यो हनी सिंग बरेच दिवस पडद्यापासून लांब होता. अनेक दिवसानंतर गायक आणि रॅपर यो यो हनी सिंगने 'मखना' या गाण्यातून कमबॅक केले. अभिनेत्री सनी लियोनीचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ती जलपरीच्या वेशात दिसते. जलपरी सनी लियोच्या या फोटोला यो यो हनी सिंगने 'मछली जल की रानी हैं' असे कमेंट केले. 'चार बॉटल वोडका' या प्रसिद्धी गाण्याच्या माध्यमातून हनी सिंग आणि सनी लियोनी एकत्र झळकले होते. 'चार बॉटल वोडका' या गाण्याणे जगभरातील तरुणांना घायाळ केले होते. भंगारवाल्याच्या कामाला प्रभावित होवून आपण या गाण्याची निर्मिती केली असल्याचे हनी सिंगने एका कार्यक्रमात सांगितले.
हनी सिंग आणि सनी लियोनी ही जोडी पुन्हा चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. सूत्रांच्या सांगण्यानुसार ‘झूठा कहीं का’सिनेमाच्या माध्यमातून ही जोडी कमबॅक करण्याच्या तयारीत आहेत. हे दोघे पुन्हा एकदा एका आयटम सॉंगवर थिरकताना दिसणार आहेत. आश्चर्य म्हणजे हे गाणे नर्सरीच्या एका कवितेवर आधारित आहे. 'मछली जल की रानी है' अशा बोलाचे हे गाणे असणार आहे.
सध्या या गाण्याची शूटिंग थायलंड येथे सुरु आहे. या गाण्यात सनी लियोनी जलपरीच्या रुपात चाहत्याच्या समोर येणार आहे. आमची संलग्न वेबसाइट डीएनएने दिलेल्या वृत्तानुसार
सनी आपल्या गाण्यासाठी आणि आगळ्या-वेगळ्या जलपरीच्या रुपासाठी खूपच उत्साहित आहे. 'मी याआधी असे गाणे कधीही केले नाही, या गाण्यासा आणि माझ्या या रुपाला चाहत्यांच्या काय प्रतिक्रीया असतील हे जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे.' असे वक्तव्य सनी लियोनीने केले.
‘झूठा कही का’ हा बहुप्रतिक्षीत सिनेमा १५ मार्चला सिनेमागृहात दाखल होणार असून सिनेमात सनी सिंग, ऋषी कपूर, जिमी शेरगिल, ओंकार कपूर, लिलेट दुबे हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.