शाहरुख खानसोबत डेब्यू, पण एका अपघाताने बिघडला चेहरा! नावाजलेली अभिनेत्री आहे ही चिमुकली
फोटोत दिसणार्या या सुंदर मुलीने एकेकाळी हिंदी चित्रपटसृष्टीत वर्चस्व गाजवलं होतं. शाहरुख खानच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतलेल्या या अभिनेत्रीच्या कारकिर्दीला एका भीषण अपघातामुळे मोठा धक्का बसला. या अपघातानंतर तिची कारकीर्द कायमची ठप्प झाली. पण ही सुंदर अभिनेत्री फक्त रील लाईफमध्येच नाही तर खऱ्या आयुष्यातही खरी योद्धा आहे.
मुंबई : फोटोत दिसणार्या या सुंदर मुलीने एकेकाळी हिंदी चित्रपटसृष्टीत वर्चस्व गाजवलं होतं. शाहरुख खानच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतलेल्या या अभिनेत्रीच्या कारकिर्दीला एका भीषण अपघातामुळे मोठा धक्का बसला. या अपघातानंतर तिची कारकीर्द कायमची ठप्प झाली. पण ही सुंदर अभिनेत्री फक्त रील लाईफमध्येच नाही तर खऱ्या आयुष्यातही खरी योद्धा आहे. अपघात ही तिच्या फक्त सुरुवात होती, त्यानंतर या अभिनेत्रीला तिच्या वैयक्तिक आयुष्यात कॅन्सर आणि घटस्फोटासारख्या आव्हानांनाही तोंड द्यावं लागलं आहे.
आत्तापर्यंत तुमच्या मनात हे आलंच असेल की, ही अभिनेत्री कोण आहे? नसल्यास, आम्ही तुम्हाला सांगतो की, तिने तिच्या पहिल्या चित्रपटासाठी तिचं नाव देखील बदललं आणि लिएंडर पेससोबत अफेअर देखील होतं. तरीही तुम्ही जर ओळखू शकत नसाल तर आम्ही तुम्हाला सांगतो की, ही सुंदर अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून महिमा चौधरी आहे, जिने तिच्या पहिल्या चित्रपटानंतर प्रचंड फॅन फॉलोइंग निर्माण केलं होतं. रितू झाली महिमा चौधरी.
महिमा ही सुभाष घई यांचा शोध असल्याचं म्हटलं जातं. महिमाने बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यापूर्वी 3000 ऑडिशन्स दिल्या होत्या. पण तिला पहिला चित्रपट मिळाला जेव्हा तिने तिचं नाव बदललं. खरंतर, दिग्दर्शक सुभाष घई त्यांच्या 'परदेश' चित्रपटासाठी 'एम'ने सुरू होणारा चेहरा शोधत होते. त्यामुळे अभिनेत्रीने तिचे नाव रितू चौधरीवरून बदलून महिमा चौधरी केलं. यानंतर, छोट्या करिअरमध्ये महिमाने दाग द फायर, प्यार कोई खेल नहीं, धडकन, खिलाडी 420 सारखे चित्रपट करून इंडस्ट्रीत चांगलं नाव कमावलं होतं.
त्या दिवसांत महिमा 'दिल क्या करे' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. एके दिवशी, सेटवर ती तिची कार चालवत असताना, त्याची एका ट्रकशी जोरदार टक्कर झाली. या अपघातात ती गंभीर जखमी झाली असून सुमारे 67 काचेचे तुकडे तिच्या चेहऱ्यावर अडकले होते. महिमा चौधरी बऱ्याच दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे, मात्र लवकरच ती कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर परतणार आहे. या चित्रपटात ती भारताच्या पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे जवळची मैत्रिण लेखिका पुपुल जयकर यांची भूमिका साकारणार आहे. महिमा चौधरी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. तिच्या मुलीसोबतच्या पोस्ट्स दररोज खूप चर्चेत असतात.