एवढी साधीसुधी महिला Instagram वर का खेचतेय लक्ष?
काही महिला साडी नेसल्यावर इतक्या उठून दिसतात, की पाहताच त्यांची स्तुती करावीशी वाटते.
मुंबई : असं म्हणतात की, साडीमध्ये स्त्रीचं सौंदर्य अधिक खुलून येतं. मग अगदी ती महागातली साडी असो किंवा अगदी स्वस्तातली. मुळातच रेखीव सौंदर्य असणाऱ्या काही महिला साडी नेसल्यावर इतक्या उठून दिसतात, की पाहताच त्यांची स्तुती करावीशी वाटते.
अशाच एका महिलेनं इन्स्टाग्रामवर धुमाकूळ घातला आहे. तिचे साडीतील फोटो पाहताना, पाहणाऱ्यांची नजरच हटत नाहीये.
अगदी साध्यासुध्या साड्यांपासून डिझायनर साड्यांमध्येही ती तितकीच सुंदर दिसत आहे.
ही महिला आहे, अभिनेत्री शोभिता धुलीपाला. 'मेड इन हेवन' या सीरिजमधून शोभितानं खऱ्या अर्थानं लोकप्रियता मिळवली आणि पाहता पाहता अभिनयासोबतच तिच्या सौंदर्यानं सर्वांनाच घायाळ केलं.
शोभिताच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवर गेलं असता, तिनं बऱ्याच लूकमधले फोटो इथं पोस्ट केल्याचं पाहायला मिळालं. त्यातही तिचे साडीतील फोटो भलतीच लोकप्रियता मिळताना दिसत आहे.
काही दिवसांपूर्वीच शोभिता श्रीलंका फिरण्यासाठी गेली होती, तिथंसुद्धा तिनं साडीमध्ये या देशातील काही भागांना भेट दिली होती.
शोभिताचा कमनी बांधा, तिची नृत्यकला हे सारंकाही शब्दांत मांडणं अशक्य... तुम्ही तिचे हे फोटो पाहून काय म्हणाल?