मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा फारच चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे सलमानचा भारत सिनेमा अचानक नाकारुन ती न्यूयॉर्कला निघून गेली. यासाठी तिने निकसोबतच्या साखरपुड्याचे कारण पुढे केले असले तरी त्यात कितपत तथ्य आहे, हे तिलाच ठाऊक. त्यानंतर निक-प्रियंकाच्या साखरपुड्याच्या चर्चांना ऊत आला. आता १६ सप्टेंबरला प्रियंका १० वर्ष लहान बॉयफ्रेंड निक जोनससोबत विवाहबद्ध होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सगळ्यावर पहिल्यांदाच प्रियंकाच्या आईने खुलासा केला आहे. खरंच प्रियंका १६ सप्टेंबरला विवाहबद्ध होईल? यावर प्रियंकाच्या आईने एका शब्दात उत्तर दिले, नाही. भारत सिनेमा मधूनच सोडल्यामुळे निर्मात्यांनी प्रियंकाला बेजबाबदार म्हटले आहे? यावर मधु चोप्रा म्हणाल्या की, हे कोणी सांगितले. हे तर तुम्हीच बोलत आहात.



मधु चोप्रा यावेळी मीडियाच्या प्रश्नांना उत्तरे देणे काहीसे टाळताना दिसल्या. प्रियंकाचे भारत सिनेमातून अचानक काढता पाय घेणे, प्रियंका-निकचे लग्न यावर त्यांनी फार बोलणे टाळले. पण प्रियंकाच्या भारत सोडण्यामागे लग्न, साखरपूडा हे कोणतेही कारण नसून सिनेमात इतर कलाकारांना घेतल्यामुळे तिची स्क्रिन स्पेस कमी झाली आणि त्यामुळे नाराज असलेल्या प्रियंकाने सिनेमातून बाहेर पडणेच, उचित समजले.