Madhurani Prabhulkar Viral Video : छोट्या पडद्यावरील मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) ही लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री आहे. मधुराणीनं 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली. मालिकेतील तिचा अभिनय तर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. मधुराणी ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहणाऱ्या मधुराणीनं नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. मधुराणीनं शेअर केलेल्या या पोस्टमध्ये तिची सगळ्यात आवडती गोष्ट काय याचा खुलासा तिनं केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मधुराणी प्रभुलकरनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मधुराणी ही तिच्या मुलीच्या डोक्याची मालिश करताना दिसत आहे. त्यानंतर मधुराणीच्या डोक्याची मालिश तिची मुलगी करते. त्यांचा हा सुंदर व्हिडीओ तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. या व्हिडीओतून मधुराणी आणि तिच्या मुलीत किती छान बॉन्ड आहे ते पाहायला मिळत आहे. या व्हिडीओला शेअर करत मधुराणीनं कॅप्शन दिलं आहे की 'माझं सगळ्यात आवडतं रोजचं काम, रोज रात्री हे काम असतं. (माय 'द मोस्ट फेव्हरेट' नाइट रुटिन). 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


मधुराणीचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, आईच्या हाताने केसांना तेल लावून घेणं हे खूप छान वाटतं. दुसरा नेटकरी म्हणाला, आमच्या घरीपण प्रत्येक शनिवारी रात्री हा प्रॉग्राम होतो. तिसरा नेटकरी म्हणाला, किती सुंदर आहे हे. आई आणि मुलीत असलेलं बॉन्ड पाहायला मिळत आहे. आणखी एक नेटकरी म्हणाला, हे खरं सुख आहे लेकी कडून लाड परम सुख. दुसरा नेटकरी म्हणाला, स्वराली तुझ्या सारखीच दिसते. तिसरा नेटकरी म्हणाला, माझी मुलगी पण अशीच हेड मसाज देते मला. 


हेही वाचा : VIDEO : प्रेग्नंट Sana Khan ला पतीनं नेलं ओढत; नवऱ्यावर टीका होताच, अभिनेत्रीनं दिलं उत्तर...


मधुराणी प्रभुलकर सोशल मीडियावर सक्रिय असते. इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे 240K फॉलोवर्स आहेत. मधुराणीनं आजवर अनेक मालिका आणि नाटकांमध्ये काम केलं आहे. सध्या मधुराणी आई कुठे काय करते या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारत आहे. अरुंधतीचं नुकतचं लग्न झालं आहे. तर त्या आधी अरुंधतीचं लग्न हे अनिरुद्धसोबत झाले होते. अनिरुद्ध ही भूमिका मिलिंद गवळी साकारत आहे. तर आता अनिरुद्धचंही लग्न त्याच्या गर्लफ्रेंड संजनाशी झालं आहे. ही भूमिका लोकप्रिय अभिनेत्री रुपाली भोसले साकारते.