मुंबई : बॉलिवूडची 'धक धक गर्ल' अर्थात माधुरी दीक्षितच्या प्रांजळ स्वभावाबद्दल अनेकांनाच माहिती आहे. पण जेव्हा माधुरी भडकते तेव्हा काय होतं, हे आमिर खानच सांगू शकतो.


जेव्हा तिचा राग अनावर होतो


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माधुरी दीक्षितच्या सेटवर सहकाऱ्यांशी मिळून- मिसळून वागते, थट्टा-मस्करी करते, अशा बऱ्याच गोष्टी तिच्याबद्दल सांगितल्या जातात.  पण जेव्हा तिचा राग अनावर होतो, तेव्हा मात्र सेटवर काही खरं नसतं.


 माधुरी दीक्षितच्या रागाचा प्रत्यय


'दिल' चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी माधुरी दीक्षितच्या रागाचा प्रत्यय, मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानला आला आहे. आमिर खानने चित्रीकरणाच्या वेळी माधुरीला प्रॅन्क करण्याचा प्रयत्न केला होता.


तेव्हा भडकेलेली माधुरी दीक्षित चक्क, हॉकी स्टिक घेऊन आमिरला मारण्यासाठी धावली होती.  सिनेमा दरम्यानचा हा किस्सा,  इंद्र कुमार यांनी एका कार्यक्रमादरम्यान सांगितला.