माधुरी दीक्षितचा कॉकटेल डान्स, व्हिडिओ व्हायरल
माधुरी दीक्षितचा एक डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या नृत्यकौशल्याची विशेष ओळख करून देण्याची गरज नाही. नुकताच माधुरी दीक्षितचा एक डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती इंग्लिश गाण्यांवर हिंदी गाण्याच्या स्टेप्स करताना दिसत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये माधुरीने लिहिलंय की, जर मी तू असतेस, हॅशटॅग रील्स इंस्टाग्राम, हॅशटॅग ट्रेडिंग रील, लोकं माधुरीच्या या डान्स स्टाइलचं खूप कौतुक करत आहेत.
माधुरी दीक्षित एक अभिनेत्रीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतील डान्सिंग दिवा देखील आहे. वयाच्या ५४ व्या वर्षीही स्वत:ला तंदुरुस्त ठेवणाऱ्या माधुरी दीक्षितने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तिचं प्रत्येक पात्र लोकांना आवडलं आहे.
माधुरी दीक्षित सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. यापूर्वी तिने तिचा मुलगा अरिन आणि पती श्री राम नेने यांच्यासोबतचा एक फोटोही शेअर केला होता. वर्क फ्रंटवर बोलायचं झालं तर, ती अलीकडेच डान्स दिवाने 3 शो जज करताना दिसली होती मात्र आता हा शो बंद झाला आहे.