आपल्यापेक्षा १८ वर्ष मोठ्या या क्रिकेटरच्या प्रेमात वेडी होती माधुरी दीक्षित
नवी दिल्ली : ९० च्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित गेल्या काही दिवसांपासून सिल्व्हर स्क्रीनवर दिसली नाही, पण आजही तिच्या नावाने अनेक चाहत्यांचे हृदय धक धक करतात.
सोशल मीडियावर माधुरीचे नाव नेहमी ट्रेंड करत असतं. आता माधुरीबाबत एक अशी गोष्ट समोर आली आहे की त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. माधुरी दीक्षित बी टाऊनच्या कोणत्याही सुपरस्टारची नाही तर एका क्रिकेटरच्या प्रेमात होती.
१९९२ मध्ये इंडिया टुडेला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये माधुरी दीक्षितने खुलासा केला होता की तिला माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर खूप आवडत होते. ती त्यांच्या प्रेमात वेडी होती. त्यावेळी तिचे वय २५ वर्ष होते आणि गावस्कर यांचे वय ४३ होते. तेव्हा गावस्कर रिटायर झाले होते. पण माधुरी त्यांच्या प्रेमात पडली होती.
माधुरी सिल्व्हर स्क्रीनवर अखेरची गुलाब गँग आणि डेढ इश्कियामध्ये दिसली होती. लवकरच ती बॉलीवुडमध्ये पुनरागमन करणार आहे. त्यासाठी ती आपल्या परिवारासाठी मुंबईत शिफ्ट झाली आहे.
काही दिवसापूर्वी माधुरीने संजय दत्तवर आधारीत दत्त या चित्रपत्रासंदर्भात निर्मात राजकुमार हिरानी यांना फोन केला होता. चित्रपटात माधुरी आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड संजय दत्त यांच्यावरील सीन दाखविण्यात येऊ नये, असे फोन करून सांगितले होते. पण नंतर एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत माधुरीने ही गोष्ट नाकारली होती.