मुंबई : बॉलिवूडमध्ये असे अनेक किस्से आहेत, जे अनेक वर्षांनंतर समोर आले. झगमगत्या  विश्वात प्रत्येक कलाकारासोबत अशी एक घटना घडते जी ते आयुष्यभर विसरू शकत नाही. असचं काही झालं होत अभिनेत्री माधुरी दीक्षितसोबत. माधुरीच्या आयुष्यातील ती एक गोष्ट जी अभिनेत्री कधीही विसरू शकत नाही.  करियरच्या सुरुवातीला माधुरीला असं काही करावं लागलं ज्याची खंत आजही तिच्या मनात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिनेमाच्या त्या सीनसाठी आयुष्यभर माधुरीला खंत
ही गोष्ट आहे त्यावेळची जेव्हा विनोद खन्ना त्यांच्या अभिनय क्षेत्रात दुसऱ्या फेजमध्ये होते. यावेळी विनोद खन्ना यांनी एक रोमँटिक भूमिका करण्याचा विचार केला होता. त्याचवेळी फिरोज खान 'दयावान' हा सिनेमा बनवत होते.



विनोद परत आल्यावर फिरोज खानने त्याला दयावानच्या मुख्य भूमिकेची ऑफर दिली आणि फिरोज खानने अभिनेत्रीसाठी माधुरीकडे संपर्क साधला. त्यावेळी माधुरी दीक्षितचं वय 21होतं , तर विनोद खन्ना 42 वर्षांचे होते. 


इंडस्ट्रीत धडपडत असलेल्या माधुरीने त्यावेळी सिनेमासाठी हो सांगितलं खरं पण, नायक वयापेक्षा खूप मोठा आहे याबद्दल तिला वाईट वाटत होतं. मात्र, चित्रपटाचे शूटिंग सुरू झालं. 



माधुरीला काय माहित होतं की या सिनेमात तिच्यासोबत काहीतरी असं घडेल जे तिला आयुष्यभर विसरता येणार नाही. सिनेमाच्या इंटीमेट आणि लिपलॉक सीनसाठी आयुष्यभर माधुरीला खंत राहिली.


माधुरी आणि विनोद यांचे काही इंटीमेट आणि लिपलॉक सीन
सिनेमात माधुरी आणि विनोद यांचे काही इंटीमेट आणि लिपलॉक सीन होते. प्रत्येकालाच असं वाटत होतं की, कदाचित माधुरी हे सीन करणार नाही. मात्र माधुरीने सर्वांना चुकीचं सिद्ध केलं आणि विनोदसोबतचे हे सीन माधुरीने अगदी सहज दिले. 


जेव्हा सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा लोक या इंटीमेट सीनबद्दल सर्वाधिक बोलले. त्यावेळेस असे सीन चित्रित करणं म्हणजे त्यावेळीची मोठी गोष्ट होती. एका मुलाखतीत माधुरी म्हणाली की, तिला बर्‍याच काळासाठी या सीनबद्दल खेद देखील वाटत होता.