COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मुंबई : बकेट लिस्ट या आगामी सिनेमाच्या निमित्ताने बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने चला हवा येऊ द्याच्या सेटवर हजेरी लावली होती. यावेळी भाऊ कदम, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके यांच्यासोबतच माधुरीनेही यावेळी धमाल मजा केली. भाऊ कदम आणि श्रेया बुगडे यांनी सलमान आणि माधुरीचा हम आपके है कौन मधील एक प्रसंग सादर केला. १९९४मध्ये प्रदर्शित झालेला सलमान-माधुरीचा हम आपके है कौन हा सिनेमा चांगलाच गाजला होता. या सिनेमातील अनेक प्रसंग यावेळी चला हवा येऊ द्याच्या सेटवर सादर करण्यात आले. चला हवा येऊ द्यामधील कलाकारांनी सादर केलेला हम आपके है कौन सिनेमा पाहून माधुरीच नव्हे तर उपस्थित प्रेक्षकांचेही हसून पोट दुखायला लागले. माधुरीसोबत बकेट लिस्ट सिनेमातील कलाकारही उपस्थित होते. माधुरीचा बकेट लिस्ट हा सिनेमा २५ मेला प्रदर्शित होणार आहे.