मुंबई : करण जोहरच्या पार्टीत शाहरुख-सलमान-ऐश्वर्यासोबत धक धकची टक्कर झाली. नुकत्याच झालेल्या करण जोहरच्या ५०व्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये बॉलिवूड फिल्म स्टार माधुरी दीक्षितनेही भाग घेतला होता. बॉलीवूडच्या या भव्य पार्टीत फिल्मी दुनियेतील एकापेक्षा एक स्टार पोहोचले. ज्यांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. करण जोहरच्या बर्थडे पार्टीतले फोटोंनी दोन दिवस सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता आणखी काही फोटो समोर आले आहेत. जे पाहून माधुरी दीक्षित, सलमान खान आणि शाहरुख खानचे चाहते आनंदाने नाचायला लागतील. विशेष म्हणजे या पार्टीत अभिनेत्री माधुरी दीक्षितने सलमान खान आणि त्याची एक्स ऐश्वर्या रायसोबत एक फोटो क्लिक केला.  


शाहरुख-सलमान-गौरी खान एकाच फ्रेममध्ये माधुरी दीक्षितसोबत दिसले
हे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या फोटोत माधुरी दीक्षित पती श्री राम नेने यांच्यासोबत सुपरस्टार सलमान खान-शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खानसोबत दिसली.


माधुरी दीक्षितनेही ऐश्वर्या रायसोबत पोज दिली
इतकंच नाही तर करण जोहरच्या या ग्रँड बर्थडे पार्टीत अभिनेत्री माधुरी दीक्षित सुपरस्टार अमिताभ बच्चन यांची सून ऐश्वर्या राय बच्चनसोबत फोटो क्लिक करताना दिसली. तिच्यासोबत प्रीती झिंटा आणि राणी मुखर्जीही उपस्थित होत्या.



 



चंद्रमुखी आणि पारो एकाच फ्रेममध्ये दिसल्या
गमतीची गोष्ट म्हणजे यावेळी लोकांच्या नजरा एकाच फ्रेममध्ये दिसणार्‍या 'देवदास'च्या 'चंद्रमुखी आणि पारो'वर खिळल्या होत्या.