Madhuri Dixit Kissing Scene : बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणजेच माधुरी दीक्षितला चित्रपटसृष्टीत चार दशकांपेक्षा जास्त काळ झाला आहे. माधुरीनं आजवर अनेक चित्रपट केले. या चित्रपटांमधील तिच्या भूमिका तर चांगल्याच गाजल्या होत्या. माधुरी फक्त रोमॅंटिक अभिनेत्रीच्या रुपात दिसली नाही तर त्यासोबतच ती काही चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिकेत देखील दिसली आहे. माधुरीनं एकदा एका किसींग सीन दिला होता. त्या किसींग सीनचा तिला पश्चाताप असल्याचे तिनं एका मुलाखतीत सांगितलं होत. आज माधुरीचा आज वाढदिवस असून आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माधुरीनं इंडियाटुडेला दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या या किसिंग सीनविषयी सांगितले होते. 1988 साली प्रदर्शित झालेल्या 'दयावान' या चित्रपटात माधुरीनं अभिनेता विनोद खन्नासोबत हा किसींग सीन दिला होता. त्यावेळी यावर सगळ्यात जास्त चर्चा सुरु झाली होती. यावर या मुलाखतीत माधुरी म्हणाली होती की 'जेव्हा मी आता मागे वळून पाहते तेव्हा वाटतं की मी  बोलायला हवं होतं की मला हा सीन करायचा नाही. पण, तेव्हा मी थोडा घाबरलो होतो. तेव्हा मी विचार करायची की मी एक अभिनेत्री आहे आणि दिग्दर्शकानं त्याला एका ठरावीक पद्धतीनं करायचा निर्णय घेतला आहे. मग जर मी हा सीन केला नाही तर त्याचा चित्रपटाच्या पटकथेवर परिणाम होऊ शकतो.' 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


माधुरी म्हणाली की, इतकंच काय तर माझं फिल्मी बॅकग्राऊंड देखील नव्हतं. त्यामुळे मला इंडस्ट्रीतल्या या गोष्टींविषयी माहित नव्हते. मला त्यावेळी माहित नव्हतं की किसींग सीन करण्यास तुम्ही नकारही देऊ शकता. त्या किसींग सीनचा चित्रपटात काही फायदा नव्हता. त्यामुळे मी ठरवलं की भविष्यात मी आता किसींग सीन देणार नाही आणि त्यानंतर मी कधीच दिला नाही. 


हेही वाचा : 'द केरला स्टोरी' फेम अभिनेत्री Adha Sharma चा अपघात! पोस्ट शेअर करत म्हणाली...


माधुरी दीक्षितच्या चित्रपटाविषयी बोलायचं झालं तर तिनं 1984 साली प्रदर्शित झालेल्या 'अबोध' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. सुरुवातीला तिचे अनेक चित्रपट फ्लॉप झाले पण 1988 साली प्रदर्शित झालेला 'तेजाब' हा चित्रपट हिट ठरला आणि एका रात्रीत माधुरीच्या लोकप्रियतेत वाढ झाली होती. त्यानंतर त्याच वर्षी 'दयावान' चित्रपट प्रदर्शित झाला आणि तोही हिट ठरला. यानंतर माधुरीनं अनेक हिट चित्रपट दिले. दरम्यान, माधुरीचा जन्म हा 15 मे 1967 साली झाला होता. तिचा आज 56 वा वाढदिवस आहे.