Oppenheimer Contro: सेक्स सीन दरम्यान भगवतगीता वाचन; `महाभारता`तील श्रीकृष्णानं केलं समर्थन!
Nitish Bharadwaj on Oppenheimer Bhagvatgita Scene: ओपेनहेमरच्या सीनची सध्या सर्वत्र चर्चा आहे. त्यामुळे यावेळी या चित्रपटातील लैंगिक संबंध ठेवताना भगवतगीतेचे वचन केले गेले असल्यानं या दृश्यावर भाष्य करण्यात आले आहे.
Oppenheimer Bhagvatgita Scene: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे ओपनहेमर या चित्रपटाची. त्यामुळे सध्या या चित्रपटातील एका दृश्यामुळे वेगळाच वादंग पसरला आहे. सेक्स करताना भगवतगीतेचं वाचन असं दृश्य असल्याचे बोलले गेले आहे. त्यामुळे यावेळी या सीनबद्दल सर्वत्र वाद सुरू झालेला पाहायला मिळतो आहे. यावेळी यावर अनेक जण भाष्य करताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. त्यातून आता यावर महाभारतातील लोकप्रिय अभिनेत्यानं भाष्य केले आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी महाभारतातील कृष्णानं यावर भाष्य केले आहे. ज्येष्ठ अभिनेते नितीश भारद्वाज यांनी यावेळी यावर भाष्य केले आहे. नक्की ते काय म्हणाले आहेत याची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.
ईटाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, ''नितीश भारद्वाज म्हणाले की, भगवतगीता युद्धाच्या मैदानात कर्तव्याची भावना शिकवते. आपल्या जीवनातील संघर्ष देखील भावनिक युद्धाप्रमाणेच आहेत. श्लोक 11. 32 मध्ये अर्जुनाला एक योद्धा म्हणून त्याचे कर्तव्य बजावण्यास सांगितलं होतं. जे दृष्याशी लढणं आहे. प्रत्येकानं श्लोक समजून घेणं आवश्यक आहे. कारण मी अनंतकाळ आहे, जो प्रत्येकाला मारून टाकेन, त्यामुळे तुम्हा मारलं नाही तरी प्रत्येक जण मरणारच. म्हणून तुमचं कर्तव्य पूर्ण करा.''
''जेव्हा ओपनहायमरनं अणुबॉम्ब तयार केला आणि जपानच्या बहुतांस लोकसंख्येला मारण्यासाठी त्याचा वापर केला तेव्हा तो स्वत: प्रश्न विचारत होता की त्यानं आपले कर्तव्य योग्यरीत्या पार पाडले आहे का? त्याच्या प्रसिद्ध मुलाखतीत तो रडताना दाखवला गेलो होता याचा अर्थ त्याला कदाचित त्याच्या शोधाबद्दल पश्चात्ताप झाला असावा. त्यानं कदाचित पाहिलं होतं की, त्याच्या शोधामुळे भविष्यात मानवजातीचा नाश होईल. त्यामुळे ओपनहायमरची ही भावनिक अवस्था समजून घेणं गरजेचं आहे. एक शास्त्रज्ञ त्याच्या निर्मितीबद्दल रात्रंदिवस विचार करत असतो. त्याच्या मनात निर्मितीबद्दलच विचार असतात. त्यामुळे कोणतीही शारिरीक क्रिया ही केवळ एक नैसर्गिक यांत्रिक क्रिया असते.''
हेही वाचा - Amarnath यात्रेनंतर दर्ग्यात पोहोचली सारा अली खान... नेटकरी म्हणाले, 'तुझ्याकडून शिकण्यासारखं...'
''मी लोकांना आवाहन करतो की, ओपेनहायमरच्या आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणांच्या या भावनिक पैलूचा विचार करा, समजून घ्या. आजची परिस्थिती कुरूक्षेत्रासारखीच आहे. म्हणूनच ब्राम्हण आणि क्षत्रियांनी जाणीवपूर्वक युद्धाचा वेद - धनुर्वेदाचा प्रचार केला नाही. संयुक्त राष्ट्रांनी आण्विक नि:शस्त्रीकरणाची गांभिर्यानं अंमलबजावणी केली पाहिजे. नोलनचा संदेश थेट आणि स्पष्ट आहे.'' अंसं त्यांनी म्हटलं आहे.