महाकुंभ मेळ्यातील व्हायरल मोनालिसा झळकणार चित्रपटात? `या` दिग्दर्शकासोबतच्या फोटोंनी वेधलं लक्ष

महाकुंभमध्ये मोनालिसा तिच्या सुंदर डोळ्यांमुळे आणि गोड हास्यामुळे व्हायरल झाली होती. ती आता लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. मध्य प्रदेशच्या महेश्वर येथील रहिवासी असलेली मोनालिसा प्रयागराजमध्ये महाकुंभ दरम्यान रुद्राक्ष माळा विकत होती. पण, अवघ्या 15 दिवसांतच ती अचानक सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिला खूप प्रसिद्धी मिळाली.
Mahakumbha 2025 Monalisa: मध्य प्रदेशच्या महेश्वर येथील रहिवासी असलेली मोनालिसा प्रयागराजमध्ये महाकुंभ दरम्यान रुद्राक्ष माळा विकत होती. तिच्या सुंदरतेमुळे तिचे फोटो आणि व्हिडीओ तिथे आलेल्या भक्तांनी सोशल मीडियावर शेअर केले काही वेळातचं ती व्हायरल होऊ लागली. मोनालिसाच्या या प्रसिद्धीमुळे दिग्दर्शक 'सनोज मिश्रा' यांचे लक्ष तिच्याकडे गेले आणि त्यांनी तिला त्यांच्या आगामी चित्रपट 'द डायरी ऑफ मणिपुर' मध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून निवडले आहे. त्यांनी थेट मोनालिसाच्या गावी जाऊन तिची भेट घेतली आणि तिने हा चित्रपट साइन केला. या सिनेमात मोनालिसा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शूटिंगपूर्वी तिला मुंबईत अभिनयाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. हा चित्रपट मणिपुरमधील सामाजिक आणि राजकीय समस्यांवर आधारित आहे.
महाकुंभमध्ये झाला प्रसिद्धीचा त्रास
महाकुंभमध्ये मोनालिसा व्हायरल झाल्यानंतर तिच्याभोवती लोकांची गर्दी जमू लागली. लोक तिचे फोटो काढायला लागले, तिच्या मागे फिरू लागले, त्यामुळे ती स्वतःतचे काम नीट करू शकत नव्हती. सततच्या त्रासामुळे शेवटी तिला महाकुंभ सोडून गावी परतावे लागले.
या अभिनेत्यासोबत शेअर करणार स्क्रिन
या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावचा मोठा भाऊ अमित राव महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. अमित राव देखील या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. या चित्रपटाचे लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक सनोज मिश्रा आहेत, तर यामीन खान आणि जावेद देवरियावाले हे सह-निर्माते आहेत.
हे ही वाचा: आलिया भट्टचे जर्मन कनेक्शन आणि ब्रिटिश नागरिकत्व, सांगितले हिटलरशी असलेलं नातं
सनोज मिश्रा हे समाजातील गंभीर विषयांवर चित्रपट बनवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी यापूर्वी 'काशी टू कश्मीर' आणि 'द डायरी ऑफ वेस्ट बंगाल' यासारखे चर्चित चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. त्यांच्या चित्रपटांचा अनेकदा विरोध झाला. पण त्यांनी भीती न बाळगता या चित्रपटांना प्रदर्शित केले आणि प्रेक्षकांनी त्यांच्या चित्रपटांना भरभरून प्रतिसाद दिला.
आता सर्वांच्या नजरा मोनालिसाच्या पदार्पणावर लागल्या आहेत. ती तिच्या पहिल्या चित्रपटात कशी भूमिका साकारते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.