मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर त्याच्या डेथ बॉडीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. व्हायरल झालेल्या या फोटोवर कलाकारांनी आणि त्याच्या चाहत्या वर्गाने विरोध दर्शवला आहे. यावर महाराष्ट्र सायबर सेलने विरोध दर्शवला आहे. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले तर कारवाई करू असा इशाला त्यांनी दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र सायबर सेलने केलेल्या ट्विटमध्ये, सोशल मीडियावर एक चिंतेत टाकणारा ट्रेंड पाहायला मिळत आहे. यामध्ये दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे फोटो व्हायरल होत आहे. ते अतिशय धक्कादायक आहे. असे फोटो व्हायरल केल्यास कडक कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे. 



दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, असे फोटो व्हायरल करणं हा गुन्हा आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार यावर कारवाई केली जाईल.



सुशांत सिंह राजपूतने रविवारी वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही माहिती समोर येताच साऱ्यांना धक्का बसला. सिनेसृष्टीपासून ते अगदी क्रिडा क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी आपली हळहळ सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केली. मात्र असं असताना सोशल मीडियावर सुशांत सिंह राजपूतच्या मृतदेहाचे फोटो देखील व्हायरल झाले. ही अतिशय धक्कादायक बाब आहे. असे फोटो व्हायरल करणं हा गुन्हा आहे. यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.