Maharashtra Shahir :  गेल्या वर्षाभरापासून प्रेक्षक ज्या क्षणाची वाट पाहत आहेत तो क्षण अखेर आला. जय जय महाराष्ट्र माझा... हे महाराष्ट्रगीत देणाऱ्या शाहीर साबळे (Shaheer Sable) यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तयार होत असलेला महाराष्ट्र शाहीर (Maharashtra Shahir) येत्या 28 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वीच संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारे गीतकार, गायक शाहीर साबळे यांच्या आधारलेला बहुचर्चित चित्रपट महाराष्ट्र शाहीर चा टीझर (Teaser of Maharashtra Shaheer) प्रदर्शित करण्यात आला आहे. गेले कित्येक दिवस प्रेक्षकांना या चित्रपटाचे स्वरुप नेमकं कसं असेल हे पाहण्याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली होती. या चित्रपटातील कलाकार कोण आहेत, अखेर या चित्रपटाची झलक प्रेक्षकांसमोर आली आहे. काही मिनिटांतचं या टीझरने प्रेक्षकांच्या अंगावर अक्षरश: काटा उभा राहिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'महाराष्ट्र शाहीर' द फिल्म या इंस्टाग्राम अकाउंटवरून चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.  या पोस्टला कॅप्शन देताना म्हटलं की, रसिकहो, मराठीचा स्वाभिमान आयुष्यभर ज्यांनी जपला. मराठी लोकसंगीत लोककला आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्यांच्यामुळे पोहोचली आहे. 'महाराष्ट्र शाहीर'  (Maharashtra Shahir) या चित्रपटाच्या टीझरमध्ये अंकुश चौधरी (Ankush Chaudhary) शाहीर साबळेंच्या भूमिकेत दमदार अंदाजात झळकत आहे.



या टीझरमध्ये अंकुश चौधरी शाहीर साकारत असलेल्या शाहीर साबळे यांची झलक दिसण्यापासून होते. तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray), यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan), साने गुरूजी (Sane Guruji), लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची झलकही या टीझरमध्ये पाहायला मिळत आहे.


 गेल्या तीन वर्षांपासून केदार शिंदे हे महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाची तयारी करत आहेत. प्रेक्षकांपर्यंत शाहिरांचा जीवनप्रवास पोहचवण्यासाठी दिग्दर्शकांसहितच कलाकार सुद्धा प्रयत्न करत आहेत. हा चित्रपट येत्या २८ एप्रिलला प्रदर्शित होणार असून आज ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाचा टीझर लाँच करण्यात आला. या प्रसंगी शाहीर साबळे यांच्या पत्नी श्रीमती राधाबाई कृष्णराव साबळे, दिग्दर्शक केदार शिंदे, प्रमुख कलाकार अंकुश चौधरी, सना केदार शिंदे, निर्माते संजय छाब्रिया आणि बेला केदार शिंदे, संगीतकार अजय-अतुल, आणि पटकथा-संवाद लेखिका प्रतिमा कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.