Maharashtrachi Hasya Jatra : सहसा एखादा व्यक्ती ज्याप्रमाणं त्याच्या कर्तृत्त्वानं मोठा होतो त्याचप्रमाणं काही व्यक्तींना मोठं करण्यामागे त्यांना आधार देणाऱ्या प्रत्येकाचाच हात असतो. मग अगदी तो एखादा लहानसा घटक का असेना. राजकीय नेतेमंडळींना मिळणारी लोकप्रियता हे त्याचच एक उदाहरण. राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाच्या मागेपुढे काही असे चेहरे घिरट्या घालत असतात, ज्यांची फार काही अपेक्षा नसते. फक्त आपलंही नाव मोठं व्हावं अशीच त्यांची एक भाबडी इच्छा असते. पण, नकळतच हे चेहरे मागे पडतात आणि नेतेच मोठे, श्रीमंत होत राहतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अवतीभोवती घिरट्या घालणारी ही मंडळी म्हणजे नेत्यांचे कार्यकर्ते. साहेबांचा 'माझ्यावर विश्वास आहे, ते कधी मला अंतर देणार नाहीत', असं मोठ्या विश्वासानं म्हणणाऱ्या याच कार्यकर्त्यांना जेव्हा आपल्या साहेबांकडूनच धक्का मिळतो, तेव्हा मात्र चित्र हादरवणारं असतं. कारण, आपला एक पायरी म्हणून वापर करत कुणीतरी प्रसिद्धीझोतात आलं, आपण मात्र असेच कुठेतरी खितपत पडलो ही भावना कार्यकर्त्यांचं मन खात असते. 


हेसुद्धा वाचा : Turkey Earthquake : प्राण्यांना भावना नसतात? तुर्की भूकंपानंतर व्हायरल होतोय 'हा' फोटो, पण त्यामागचं सत्य माहितीये का? 


अशाच भाबड्या कार्यकर्त्यांची व्यथा काही वर्षांपूर्वी अभिनेता ओंकार भोजने (Onkar bhojne ) यांनं एका विनोदी कार्यक्रमातून मांडली होती. चारोळ्या आणि कवितांमुळंही चर्चेत असणाऱ्या आणि त्या तितक्याच अनोख्या पद्धतीनं सादर करणाऱ्या ओंकारनं 'मी कार्यकर्ता' हे गीत सादर केलं होतं. हेच गाणं सध्या इन्स्टा रील्स आणि युट्यूब शॉर्ट्समध्ये व्हायरल होत आहे (Onkar bhojne Video). 


ते ऐकत असताना, खरंच कार्यकर्ता म्हणवणारा एक मोठा वर्ग आहे जो कायमच दुर्लक्षित राहतो हे लक्षात येत आहे. स्वर्थापोटी राजकारणाच्या पटलावर चाल चालणाऱ्या प्रत्येक नेत्यालाच नव्हे तर सर्वसामान्यांनाही हा व्हिडीओ खडबडून जाग आणत आहे.


मी कार्यकर्ता... 


मी कार्यकर्ता... 
कार्यकर्ता ज्यानं विचार न करता साऱ्या आयुष्याकडे पाहिलं,
साहेबांच्या गर्दीमध्ये चिरडून मरता मरता, फक्त जगायचं राहिलं
स्वत:कडे बघायचं राहिलं... मी कार्यकर्ता 
मी बिनडोक... कारण मी कार्यकर्ता 
साहेब माझा मोठ्या मोठ्या गाडीमधून फिरतो, 
मी मात्र रस्त्यावरती किका मारून मरतो... 
मी कार्यकर्ता...
नाही मला मेंदू आणि नाही आचार विचार 



सोशल मीडियावर व्हायरल होणारं गाणं तुम्हालाही पटलं ना? टॅग करा मग अशा कार्यकर्त्यांना....