Maharashtrachi Hasyajatra Pruthik Pratap: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम म्हणून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ला ओळखले जाते. या कार्यक्रमाचे महाराष्ट्रासह जगातही चाहते आहेत. या कार्यक्रमातील प्रत्येक पात्र हे घराघरात लोकप्रिय आहेत. याच कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेल्या एका कलाकाराने अवघ्या सहा महिन्यात त्याचे स्वप्न पूर्ण झाल्याचा खुलासा केला आहे. त्याची सोशल मीडिया पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पृथ्वीक प्रतापला यंदाच्या म्हाडाच्या लॉटरीत घर लागलं होतं. पृथ्वीकचा आवडता अभिनेता शाहरुख खानच्या वाढदिवशी म्हणजेच २ नोव्हेंबर रोजी त्याचे हे घर नावावर झालं. पृथ्वीकने हे घर घेऊन 2 महिने उलटले आहेत. आता त्याने या घराचा स्वप्नांपासून… सत्यापर्यंत जाण्याचा प्रवास सांगितला आहे. पृथ्वीकने नुकतंच इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत त्याची आई एका मोठ्या सोफ्यावर बसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद दिसत आहे. या फोटोला त्याने हटके कॅप्शन दिले आहे. 


पृथ्वीक प्रतापचे स्वप्न पूर्ण 


"स्वप्नांपासून… सत्यापर्यंत..! आजपासून ६ महिन्यांपूर्वी एका इंटरव्यू मध्ये माझं एक स्वप्न मी जगासमोर बोलून दाखवलं.. तेव्हा कल्पना ही नव्हती की अगदी सहा महिन्यात universe माझ्या प्रयत्नांना योग्य वाट दाखवेल… आज आई ला आणि जाई ला स्वतःच्या घरात खुश पाहून भरुन पावलोय. तरीही अजून पेंटहाऊस आणि Queen’s Throne बाकी आहे. पण साला हार नाही मानणार… कारण मध्यमवर्गीयांची स्वप्न आणि त्यांच्या शर्यती, फक्त बघण्यासाठी नाही पूर्ण करण्यासाठी असतात", असे त्याने म्हटले आहे. 



आणखी वाचा : शशांक केतकरने केली BMC च्या कारभाराची पोलखोल, म्हणाला 'घाणेरडी मुंबई...'


पृथ्वीक प्रतापच्या या पोस्टवर अनेक कलाकार कमेंट करताना दिसत आहेत. अभिनेता प्रथमेश परबने "आई, मला तुझा अभिमान वाटतो" असे म्हटले आहे. तर अभिनेता चेतन वडनेरेने फायर इमोजी शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. त्याबरोबरच अनेक चाहत्यांनी हार्ट इमोजी पोस्ट करत कमेंट करताना दिसत आहेत.


दरम्यान पृथ्वीकने काही महिन्यांपूर्वी त्याच्या नव्या घराच्या बाहेरील फोटो पोस्ट केला होता. त्याला कॅप्शन देताना त्याने “आजवर अनेक स्वप्न पाहिली… अनेक पूर्ण केली…अनेक स्वप्न जगली आणि अनेक स्वप्न भंगली सुद्धा, पण एक स्वप्न जे आजपर्यंत हुलकावणी देत होतं ते पूर्णत्वाला आलं…आयुष्याची ३० वर्षे आश्रितासारखी काढलेल्या प्रत्येकाला एक दहा बाय दहाचं छप्पर ही आभाळापेक्षा कमी नसतं…” असे म्हटले होते. 


त्यासोबतच “आज स्वतःच्या घरापुढे उभं राहून हा फोटो काढताना खरच आभाळ ठेंगण झाल्यासारखं वाटतंय. घर छोटं आहे पण माझ्या कुटुंबाचं आहे. ही स्वप्नपूर्तीची वाटचाल अजून अशीच सुरू राहणार आहे कारण ‘Penthouse’ अभी बाकी है मेरे दोस्त…! गंमत म्हणजे आज २ नोव्हेंबरला हे घर माझ्या नावावर झालंय म्हणजे ‘शाहरुख खान’च्या वाढदिवशी. त्यामुळे माझी ‘मन्नत’ पूर्ण झाली असं म्हणायला हरकत नाही,” असंही पृथ्वीक म्हणाला होता.