`माणूस कधीच एकटा...`, रसिका वेंगुर्लेकरसाठी नवऱ्याची खास पोस्ट
रसिका वेंगुर्लेकरच्या लग्नाला सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने तिच्या नवऱ्याने तिच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
Rasika Vengurlekar Marriage Post : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम म्हणून महाराष्ट्राची हास्यजत्रा याकडे पाहिले जाते. या कार्यक्रमातील अनेक विनोदवीर हे सतत काही ना काही कारणांनी चर्चेत असतात. याच कार्यक्रमामुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे रसिका वेंगुर्लेकर. नुकतंच तिच्या लग्नाला सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने तिच्या नवऱ्याने तिच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
रसिका वेंगुर्लेकर ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. रसिका ही कायमच विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. रसिकाने 2018 मध्ये दिग्दर्शक अनिरुद्ध शिंदेसोबत लग्नगाठ बांधली. नुकतीच त्यांच्या लग्नाला सहा वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने अनिरुद्धने एक खास पोस्ट शेअर केली आहे. यावेळी त्याने एक फोटोही पोस्ट केला आहे.
रसिका वेंगुर्लेकरसाठी खास पोस्ट
"माऊ माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक चढ-उतारात तू कायम माझ्यासोबत असतेस..अशीच माझ्या सोबत आयुष्यभर रहा..माझ्याकडून घडलेल्या चुका तू नेहमी समजून घेतेस आणि मला योग्य तो मार्ग दाखवतेस. माणूस कधीच एकटा यशस्वी होत नाही.. त्याच्यासोबत असणारी माणसं,पाठीशी असलेली त्याची साथ,यामुळे त्याला बळ मिळतं..आणि मी यशस्वी होण्यामध्ये मोलाचा आणि जास्त वाटा तुझा आहे. तुलाही आयुष्यात मोठं होताना बघुन खूप आनंद होतोय. खूप कौतुक वाटत तुझं,तुझ्या यशाच्या वाटचालीत मी नेहमी आहे तुझ्यासोबत कायम..अशीच मेहनत करूया दोघांनी मिळून,कारण आपला प्रवास खूप दूरचा आहे,आणि ह्या प्रवासात तुझा हा सहप्रवासी नेहमी तुझ्यासोबत आहे.. लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा माऊ", असे अनिरुद्ध शिंदेने म्हटले आहे.
अनिरुद्धची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याच्या या पोस्टवर अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहेत. या पोस्टवर अनेकांनी रसिका आणि अनिरुद्धला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासोबत अनेकांनी यावर हार्ट इमोजीही पोस्ट केले आहेत.
"महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमामुळे प्रसिद्धीझोतात"
दरम्यान रसिका आणि अनिरुद्धची पहिली ओळख महाविद्यालयात झाली. ते दोघेही दहा वर्ष एकमेकांना डेट करत होते. यानंतर त्या दोघांनी लग्न केले. रसिकाने ‘दिल दोस्ती दुनियादारी’, ‘फ्रेशर्स’ मालिकेत काम केले आहे. तिला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामुळे लोकप्रियता मिळाली. तर, अनिरुद्ध एक प्रसिद्ध दिग्दर्शक असून, त्याने ‘फ्रेशर्स’, ‘का रे दुरावा’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांचे दिग्दर्शन केले आहे.